---Advertisement---

VIDEO: ‘अंतिम सामन्या’त विकेट घेताच गेलला आनंदाने फुटले पंख, ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मारली मिठी

---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (६ नोव्हेंबर) वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर वेस्ट इंडिज संघाला या स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेला सामना हा ख्रिस गेल आणि ड्वेन ब्रावोच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. या सामन्यात ख्रिस गेलने गोलंदाजी करताना असे काही केले होते, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी १५८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर मिचेल मार्श फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने अप्रतिम फलंदाजी करत डेविड वॉर्नरसोबत महत्वाची भागीदारी केली. त्यानंतर २९ चेंडूंमध्ये त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सामना जिंकणे आणखी सोपे झाले.

तर झाले असे की, आपला शेवटचा सामना खेळत असलेला ख्रिस गेलला कायरन पोलार्डने १६ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला बोलवले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर मिचेल मार्शने कव्हरच्या वरून चौकार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो झेलबाद होऊन माघारी परतला. जेव्हा तो बाद होऊन डगआऊटच्या दिशेने जात होता, त्यावेळी ख्रिस गेलने त्याला मागून जाऊन त्याला मिठी मारली. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कायरन पोलार्डने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर एविन लुईसने २९ आणि शिमरोन हेटमायरने २७ धावांची खेळी खेळी. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला २० षटक अखेर ७ बाद १५७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना डेविड वॉर्नरने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ५३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नरने बलाढ्य वेस्ट इंडिजला दिवसा दाखवले चांदणे, नाबाद ८९ धावा चोपत केला मोठा किर्तीमान

अफगाणिस्तानच्या खांद्यावर भारताचे ओझे; पण न्यूझीलंड जिंकल्यास काय? जडेजा म्हणाला, ‘बॅग भरून…’

ब्रावोसह ‘या’ विंडीज क्रिकेटरचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा? ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---