वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ख्रिस गेलने सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये एमिरेट्स एअरलाइन्सवर आपला राग व्यक्त केला आहे. कन्फर्म तिकीट मिळाल्यानंतरही त्याला विमानात चढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे गेलला दुसर्या फ्लाइटने जावे लागेल, ज्यामुळे त्याचा वेळ वाया गेला.
गेलची नाराजी पाहून फ्लाइट कंपनीने त्वरित माफी मागितली आणि याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले. तथापि, गेलने आपल्या ट्वीटमध्ये तो कोणत्या शहरात आहे आणि कोठे प्रवास करणार असल्याचे सांगितले नाही.
गेलने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की ‘एमिरेट्सवर मी खूप नाराज आहे, माझ्या जवळ कन्फर्म तिकीट असून मला विमानातील सर्व जागा भरल्या असल्याचे असल्याचे सांगण्यात आले, हा काय विनोद आहे. एवढेच नाही एमिरेट्सचे म्हणणे होते की मी इकोनॉमी क्लाने प्रवास करावा पंरतू माझ्याकडे बिजनेस क्लासचे तिकीट होते. मला आता नंतरच्या विमानाने प्रवास करावा लागेल. अंत्यत हास्यास्पद. एमिरेट्स वाईट अनुभव.’
So disappointed @emirates, I have a confirmed flight and they gonna tell me that they are over booked, WTF! Not only that, @emirates want me to travel economy when it’s a business class ticket – so now I have to travel on a later flight! Just ridiculous @emirates!Bad experience????
— Chris Gayle (@henrygayle) November 4, 2019
गेलच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना एअरलाइन्स कंपनीने लिहिले की, ‘ख्रिस, आम्ही याबद्दल दिलगीरी व्यक्त करत आहोत. कृपया तुमचा बुकिंग नंबर आणि ईमेल आयडी आम्हाला पाठवा. आम्ही आपल्या पर्यायांची चौकशी करू आणि तुम्हाला कळवू.’
We're sorry to know about this, Chris. Please DM us your booking reference and email address. We'll check your options and let you know.
— Emirates Support (@EmiratesSupport) November 4, 2019
गेलची किक्रेट कारकीर्द
गेल वनडे क्रिकेटमध्ये वेस्टइंडीजकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या प्रकारामध्ये गेलने 301 सामन्यामध्ये 37.83 च्या सरासरीने 10480 धावा केल्या. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये 103 सामन्यामध्ये 42.18 च्या सरासरीने 7214 आणि आंतरराष्ट्रीय टी- 20 मध्ये 58 सामन्यामध्ये 32.54 च्या सरासरीने 1627 धावा केल्या.






