---Advertisement---

गेल आयपीएलमधून होणार निवृत्त? पंजाब स्पर्धेतून बाहेर पडल्यावर ‘युनिव्हर्स बॉस’चे भावुक ट्विट

On: मंगळवार, नोव्हेंबर 3, 2020 1:47 PM
---Advertisement---

वेस्टइंडिज क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा जगात ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसला. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान मिळाले नाही. मात्र, काही सामन्यांनंतर मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर वापर केला आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून दिले. परंतु मागील दोन सामन्यात या संघाचा पराभव झाला आणि संघ स्पर्धेतून पडला. यांनतर ख्रिस गेलने ट्विटरवरून केलेल्या एका पोस्टमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ख्रिस गेलने दिले निवृत्तीचे संकेत?
ख्रिस गेलने सोमवारी (2 नोव्हेंबर) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक भावुक ट्विट केले. त्यानंतर चाहत्यांना तो निवृत्ती घेणार का हा प्रश्न पडला.

ख्रिस गेलने ट्विट केले की, “कृपया माझा हंगाम संपला असला, तरीही आयपीएल पाहणे सुरू ठेवा.धन्यवाद.”

https://twitter.com/henrygayle/status/1323234061003968512

चाहत्यांनी विचारले प्रश्न
गेलच्या या ट्विटनंतर चाहत्यांना असे वाटले की युनिव्हर्स बॉस निवृत्ती घेणार आहे आणि तो यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी त्याला निवृत्तीबाबत प्रश्नही विचारले.

https://twitter.com/AazimKassim/status/1323234861037940736

https://twitter.com/SKHarishbabu/status/1323235855004180480

https://twitter.com/ANANDKRISH555/status/1323245671902662658

https://twitter.com/Sanuyadav262/status/1323427038812798976

https://twitter.com/IDNSMONSTER/status/1323250016270471168

https://twitter.com/ImAbhiM/status/1323243845161644032

ख्रिस गेल याची आयपीएल 2020 मधील कामगिरी
ख्रिस गेलला अवघ्या 7 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 41.14 च्या सरासरीने 288 धावा केल्या. या दरम्यान गेलने 3 अर्धशतके झळकावली. राजस्थान विरुद्ध त्याने 99 धावा केल्या. त्याने अवघ्या 7 सामन्यात 23 षटकार ठोकले आणि टी-20 कारकीर्दीतील 1000 षटकारही पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी पृथ्वी शॉच्या खराब फॉर्मबद्दल माजी दिग्गजाने दिली तिखट प्रतिक्रिया

बापरे! बीसीसीआयवर कॉपीराईटचा आरोप, झाली मोठी कारवाई

‘या’ व्यक्तीने अजिंक्य रहाणेला बेंगलोरविरुद्ध पाठवले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला

ट्रेंडिंग लेख –

IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---