---Advertisement---

‘गेल स्टॉर्म’ पुन्हा येणार; ‘या’ स्पर्धेतून ख्रिस गेल करणार पुनरागमन

On: सोमवार, डिसेंबर 21, 2020 7:36 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हे अबुधाबी टी१० लीगमध्ये सहभागी होणार आहेत. अबुधाबी टी१० लीगचा चौथा हंगाम २८ जानेवारीपासून खेळवला जाईल. गेल या स्पर्धेसाठी अबुधाबी संघाचा आयकॉन खेळाडू असेल. गेलने स्वतः आपण या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

मी टी१० स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक- ख्रिस गेल
टी२० क्रिकेटमध्ये एक हजार षटकार मारणारा ख्रिस गेल एकमेव फलंदाज आहे. गेलने २२ टी२० शतके देखील ठोकली आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याविषयी बोलताना गेल म्हणाला, “क्रिकेटचा हा लहानातील लहान प्रकार अत्यंत रोमहर्षक आहे. मी शेख झायेद स्टेडियमवर पुन्हा खेळण्यासाठी उत्सुक आहे. लक्ष ठेवा. गेल स्टॉर्म येणार आहे.”

अबुधाबीत होणार टी१० लीगचे आयोजन
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अबुधाबीमध्ये अबुधाबी टी१० लीगचे आयोजन होणार आहे. हा स्पर्धेचा चौथा हंगाम असेल. स्पर्धेतील सर्व सामने अबुधाबीमधील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. ख्रिस गेल अबुधाबी, तर शाहिद आफ्रिदी कलंदर संघाचा आयकॉन खेळाडू असेल. या दोघांव्यतिरिक्त ड्वेन ब्रावो दिल्ली बुल्स, सुनील नरेन डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करतील.

वरील दिग्गज टी२० खेळाडूंव्यतिरिक्त शोएब मलिक (मराठा अरेबियन्स), इसुरू उदाना (बांगला टायगर्स) आणि थिसारा परेरा (पुणे डेव्हिल्स) हे खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील. अबुधाबी टी१० लीग ही अशी एकमेव टी१० स्पर्धा आहे, जिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व अमिराती क्रिकेट बोर्डाने संमती दिली आहे. मागील वर्षी मराठा अरेबियन्सने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

युएईत गेलने आयपीएलमध्ये केली दिमाखदार कामगिरी
युएईमध्ये मागील महिन्यात संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये गेलने दिमाखदार कामगिरी केली होती. सुरुवातीच्या सामन्यात संधी न मिळाल्याने गेल स्पर्धेच्या उत्तरार्धापासून किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी खेळला होता. गेलने आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळलेल्या सात सामन्यात १३७ च्या सरासरीने २८८ धावा ठोकल्या होत्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. गेलच्या आगमनानंतर पंजाबने सलग पाच सामन्यात विजय मिळवण्याची कामगिरी करून दाखवलेली.

महत्त्वाच्या बातम्या-

ज्युनियर कोहली आणि ज्युनियर स्मिथ खेळणार अ‍ॅशेस? पाहा कोण म्हणालं…

सराव सामन्यात शतक ठोकणारा ‘तो’ ठरणार टीम इंडियाचा तारणहार; मुरली कार्तिकचे विधान

कांगारूविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव मिळूनही चमकला अश्विन; कसोटी क्रमवारीत झाला मोठा फायदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---