वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी२० सामना वेस्ट इंडिज संघाने ८ गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने दिलेले १६१ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिज संघाने १५ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. टी२० क्रिकेटमधील अव्वल संघांपैकी एक असलेल्या कायरन पोलार्डच्या संघाने या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या चार अनुभवी खेळाडूंनी तब्बल ६ वर्षाच्या कालावधीनंतर एकत्रित आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला
हे खेळाडू ६ वर्षानंतर आले एकत्र
वेस्ट इंडीज संघातील संघातील वरिष्ठ खेळाडू ख्रिस गेल, कर्णधार कायरन पोलार्ड, अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो आणि आंद्रे रसेल हे सर्वजण तब्बल ६ वर्षांनंतर प्रथमच एकत्रितरीत्या मैदानात उतरले. हे चारही स्फोटक खेळाडू एकाच संघात खेळत असताना चाहत्यांचे मनोरंजन होणे नक्की असते. २०१५ मध्ये अखेरच्या वेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच या चौघांनी एकत्रित टी२० सामना खेळला होता.
वेस्ट इंडीजने नोंदवला विजय
ग्रेनाडा येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत दक्षिण आफ्रिकेचा डाव ६ बाद १६० धावसंख्येवर रोखला. फिरकीपटू फॅबियन ऍलन व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन तर, जेसन होल्डर याने एक बळी मिळविला. दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक नाबाद ५६ धावांची खेळी वॅन डर डसेनने खेळली.
प्रत्युत्तरात, सलामीवीर एविन लुईसने केवळ ३५ चेंडूत ७१ धावा झोडत दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानातील हवा काढून टाकली. तो बाद झाल्यानंतर ख्रिस गेलने अखेरपर्यंत नाबाद राहत ३२ धावा काढून संघाला १५ व्या षटकात विजय मिळवून दिला. एविन लुईसला आक्रमक खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वेस्ट इंडीज संघ करतोय विश्वचषकाची तयारी
टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी जास्त वेळ शिल्लक नाही. अशा परिस्थितीत वेस्ट इंडीज परिपूर्ण संघ बनवण्याची तयारी करत असल्याचे दिसते. त्यांना विश्वचषकापर्यंत १५ टी२० सामने खेळायचे असून, हे त्यांच्यासाठी सराव सामन्यांसारखे आहेत. कायरन पोलार्डच्या नेतृत्वातील संघात अनेक वरिष्ठ खेळाडूंची वापसी झाली आहे. वेस्ट इंडीजने डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात २०१३ व २०१६ मध्ये टी२० विश्वचषक जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो’ एक झेल सोडणे भारतीय संघाला WTC फायनलमध्ये पडले महागात, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे मत
‘हे’ होते १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील सर्वात सभ्य आणि खोडकर खेळाडू, कर्णधाराने केला खुलासा
चौफेर टीका होणार्या भारतीय संघाच्या मदतीला धावला गांगुली, ‘या’ शब्दांत केली पाठराखण