fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटमधील ‘अशा’ वाईट घटनांचा धक्कादायक खुलासा गेलने कधी यापुर्वी नव्हता केला

मुंबई । कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह इतर देशातही वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला जात आहे. या वर्णद्वेष विरोधात वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने देखील आवाज उठवला आहे. 

ख्रिस गेलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक संदेश लिहिले की, “वर्णद्वेष केवळ फुटबॉलमध्ये आहेच असे नाही, क्रिकेटमधे पण आहे. कृष्णवर्णीयांच्या जीवनाला देखील अर्थ आहे. सर्व वर्णद्वेषी लोकांनी कृष्णवर्णीय लोकांना मूर्ख समजणे बंद करावे. आमचेच काही लोक वर्णद्वेषी लोकांना असे करण्याची संधी देतात. स्वतःला कमीपणा वाटणाऱ्या घटनेला वेळीच रोखा. मी जगभर प्रवास केला आहे आणि आता अशा भेदभावाचा मला अनुभव आला आहे. कारण मी कृष्णवर्णीय आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. ही यादी खूप मोठी आहे. वर्णद्वेष केवळ फुटबॉलमध्ये नाही तर क्रिकेटमध्ये पण होतो. संघामध्ये पण आहे.”

झाले असे की, काही दिवसापूर्वी जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीला कारागृहात असताना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण अमेरिकेत पसरत आहेत. जॉर्जला न्याय मिळावा यासाठी अमेरिकन नागरिक रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत आहेत.

जोफ्रा आर्चरलाही करावा लागला सामना

मागील वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्याच्या वेळी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला एका फॅनने वर्णद्वेषाची टिपण्णी केली होती. याचा खुलासा त्याने ट्विटरवर केला होता.

You might also like