---Advertisement---

पुन्हा पाहायला मिळणार ‘गेल स्टॉर्म’! ‘या’ संघाशी झाला करारबद्ध

On: शुक्रवार, मे 28, 2021 7:50 PM
---Advertisement---

मागील वर्षापासून जगभरात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे जगभरातील मैदानांवर प्रेक्षक येऊ शकत नाहीत. काही स्पर्धा तर रद्द कराव्या लागल्या असून, काही स्पर्धा अर्ध्यातून स्थगित केल्या जात आहेत. वेस्ट इंडीजमध्ये आयोजित होणारी कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) ही प्रमुख व्यावसायिक टी२० लीग लवकरच अनेक निर्बंधासह सुरू होणार आहे. या प्रमुख स्पर्धेसाठी आता संघांनी खेळाडूंना करारबद्ध करण्यास सुरुवात केली असून, विविध संघांनी अनेक बडे खेळाडू आपल्या गळाला लावले आहेत. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत पार पडेल.

हे दिग्गज दिसणार सीपीएलमध्ये
सीपीएलसाठी सर्व फ्रॅंचाईजींनी संघ बांधणीला तयारी केली असून, अनेक नामवंत खेळाडू संघांशी करारबद्ध देखील झाले आहेत. युनिव्हर्स बॉस नावाने ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा दिग्गज ख्रिस गेल मागील हंगामाला मुकल्यानंतर यावर्षी सेंट किट्स व नेविस पेट्रीएट्स या संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येईल. गेलने यापूर्वी याच संघासाठी दोन हंगाम खेळलेले. गेलच्या नेतृत्वाच्या संघाने २०१७ मध्ये स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन हा या हंगामात जमैका तल्लावाह संघासाठी आपले कसब दाखवेल. त्याने यापूर्वी सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडंट संघासाठी खेळ दाखवलेला. शाकिबच्या अनुभवाचा मोठा फायदा जमैका संघाला होईल. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस यावर्षी सेंट लुसिया झुक्सचे प्रतिनिधित्व करेल. प्लेसिस सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएलमध्ये त्याने सलग चार सामन्यात अर्धशतक ठोकलेली.

एकाच मैदानावर होणार स्पर्धा
सीपीएलच्या आगामी हंगामातील सर्व सामने सेंट किट्स व नेविस येथील मैदानावर खेळले जातील. सेंट किट्स व नेविस सरकारने मैदान क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी येण्याची परवानगी दिली असून, येणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी कोरोना लसीकरण केले असावे, ही अट घातलेली आहे. कायरन पोलार्ड यांच्या नेतृत्वातील ट्रिबॅगो नाईट रायडर्स संघ सीपीएलचा माजी विजेता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बुडत्याला काठीचा आधार! सुशील कुमारची ‘ही’ मागणी कोर्टाने केली मान्य

स्वप्न भंगले! सायना नेहवाल, किदांबी श्रीकांतच्या टोकियो ऑलिंपिक खेळण्याच्या आशा मावळल्या; तर ‘हे’ खेळाडू पात्र

कमालीची डेरिंग! ‘असे’ ५ करारबद्ध क्रिकेटपटू, ज्यांनी त्यांच्याच बोर्डाशी घेतली पंगा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---