इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणारा वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल सध्या मालदीवमध्ये आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे तो मालदीवमध्ये मिळालेल्या रिकाम्या वेळेचा आनंद घेताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असणारा ख्रिस गेल नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अशातच त्याचा मालदीव मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ख्रिस गेलचे इंस्टाग्राम अकाऊंटवर ३.५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो काही न काही शेअर करतच असतो. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो स्कूबा डायव्हिंग करताना दिसून येत आहे.
परंतु तो युनिव्हर्सल बॉस आहे. तो नेहमी काहीतरी हटकेच करणार. या व्हिडिओमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना तो मासे तर पकडतच आहे, यासोबतच तो पाण्यात पुशअप्स मारताना देखील दिसून येत आहे. हा व्हिडिओ २ लाखा पेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे. तसेच त्याने या व्हिडिओला कॅप्शन म्हणून ‘ स्कुबा इन मालदीव ‘ असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CPAInZ3hreg/
गेलच्या आयपीएल २०२१ स्पर्धतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्यासाठी हे हंगाम इतके खास नव्हते. पंजाब किंग्ज संघाकडून सलामी फलंदाजी करताना त्याने, ८ सामन्यात २५.४२ च्या सरासरीने अवघ्या १७८ धावा केल्या. परंतु या हंगामात त्याने आयपीएल इतिहासात ३५० षटकार मारणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला. आता ख्रिस गेलच्या नावावर आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम आहे.
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील आयपीएल २०२१ स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची झाली होती. एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा पुन्हा केव्हा खेळवण्यात येईल याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडच्या नील वॅगनरनचा सराव होण्यासाठी ‘हा’ युवा गोलंदाज करणार भारतीय संघाला मदत
फुटबॉलपटू राहुल चाहर आणि ज्योतिषी सौरभ तिवारी, मुंबई इंडियन्सने शेअर केला मजेशीर व्हिडिओ