वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे भारतावर विशेष प्रेम आहे. त्याने अनेकदा विविध ठिकाणी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून ते जाहीर देखील केले आहे. गेल भारतीय चाहत्यांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे. आयपीएलमध्ये खेळत असतांना चाहते त्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत असतात.
मात्र गेल सध्या क्रिकेटमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जमैकाच्या भारतीय उच्चायुक्तालयाने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे गेल सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत ख्रिस गेल एका खास कारणासाठी भारताचे आभार मानताना दिसतो आहे.
पंतप्रधानांसह जनतेचे मानले आभार
गेल्या एका वर्षापासून संपूर्ण जग कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. वेस्ट इंडिजला देखील या विषाणूचा बराच फटका बसला आहे. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजने भारताकडे कोरोना विषाणूवरील लसीचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. भारत सरकारने ही विनंती स्विकारत लसीचा पुरवठा केला आहे.
याच कारणासाठी आता ख्रिस गेलने एक व्हिडिओ शेअर करत भारताचे आभार मानले आहेत. या व्हिडिओत गेलने भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, तसेच भारतीय जनता आणि भारत सरकार यांचे ही लस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच लवकरच मी भारतात येईल, असे या व्हिडिओच्या शेवटी त्याने म्हंटले आहे.
Legendary Jamaican & WI Cricketer @henrygayle thanks PM @narendramodi, the People and Government of #India for the gift of #MadeInIndia Vaccine to #Jamaica#VaccineMaitri @PMOIndia @DrSJaishankar @MEAIndia @IndianDiplomacy pic.twitter.com/fLBbhF5zTY
— India in Jamaica (@hcikingston) March 19, 2021
यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार ख्रिस गेल
आयपीएलच्या आगामी हंगामाला येत्या ९ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. ख्रिस गेलला या हंगामासाठी पंजाब किंग्जने (पूर्वीचे किंग्ज इलेव्हन पंजाब) संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे या हंगामासाठी तो लवकरच भारतात दाखल होईल.
महत्वाच्या बातम्या:
बाबर आझमच्या अडचणीत वाढ, या प्रकरणी न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे दिले आदेश
INDvENG: संघ अडचणीत असताना का मैदानाबाहेर गेला कर्णधार कोहली? स्वत:च केला खुलासा






