---Advertisement---

IPL 2020: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ‘युनिवर्सल बॉस’ ख्रिस गेलचे होणार कमबॅक?

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 1:09 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. पंजाबने खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाबला  कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यात पंजाब संघात मोठे बदल होऊ शकतात. अशा परिस्थितीत आज सर्वांचे लक्ष टी20 मधील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर असेल. त्याला या स्पर्धेत खेळण्याची अद्यापही संधी मिळालेली नाही.

गेलला अन्नातून झाली होती विषबाधा 

मागील सामन्यात गेल खेळणार होता. परंतु त्याला अन्नातून विषबाधा झाली होती त्यामुळे तो खेळू शकला नाही असे पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले होते.

अशा परिस्थितीत जर तो तंदुरुस्त राहिला तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देता येईल. पण गेल चांगली कामगिरी करेल की नाही हे कुणीच सांगू शकत नाही. जानेवारीपासून तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. वैयक्तिक कारणास्तव त्याने कॅरेबियन क्रिकेट लीगमधून माघार घेतली होती. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये त्याने अखेरचा सामना खेळला होता.अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या जागी गेलला संघात स्थान मिळू शकेल.

आयपीएलचा बादशाहा आहे गेल

आयपीएलमध्ये गेलच्या नावावर खालील विक्रमांची नोंद आहे:
सर्वाधिक षटकार – 326
सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या – 175*
एका डावात सर्वाधिक षटकार – 17
सर्वाधिक शतके – 6
सर्वात जलद शतक – 30 चेंडू

पंजाबच्या अडचणी

पंजाबच्या अडचणी वाढतच आहेत. सतत झालेल्या पराभवामुळे संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. या संघाने आतापर्यंत केवळ एक सामना जिंकला आहे. 6 पैकी 5 सामने गमावल्यानंतर पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी या संघाला उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बीसीसीआयमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोडली ‘ही’ परंपरा, महान क्रिकेटपटू ऍलन बॉर्डरने व्यक्त केली नाराजी

‘आम्ही संघाचे उत्तम संयोजन केले, म्हणूनच..’ KKR च्या प्रशिक्षकाने सांगितले कुलदीपला वगळण्याचे कारण

फ्रेंच ओपन २०२०: श्वार्टझमनला पराभूत करून नदालचा फायनलमध्ये प्रवेश, जोकोविचशी होणार अंतिम लढत

ट्रेंडिंग लेख –

शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…

किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला

आपल्या छोट्याशा पण ऐतिहासिक खेळीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात घर करुन राहिलाय महाराष्ट्राचा ‘समीर दिघे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---