विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची धडाकेबाज फलंदाजी क्रिकेटप्रेमींना पुन्हा पाहायला मिळणार आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी२० साठी गेलची विंडीज संघात निवड झाली आहे.
कोलकाता मधील इडन गार्डन मैदानावर ३ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हा गेलचा पुनरागमनापूर्वीचा शेवटचा सामना होता.त्यांनतर हा दिग्गज खेळाडू विंडीजच्या राष्ट्रीय संघाकडून एकही सामना खेळलेला नाही.
विशेष म्हणजे गेलच होम ग्राउंड असणाऱ्या सबिना पार्कवर हा सामना होत आहे. त्यात गेल प्रथमच आंतरराष्ट्रीय टी२० आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहे.
गेल हा विंडीजचा सर्वात यशस्वी टी२० खेळाडू असून त्याने ३५.३२ च्या सरासरीने या प्रकारात १५१९ धावा केल्या आहेत. त्याला सध्या फॉर्मशी झगडत असणाऱ्या लेंडल सिमन्सच्या जागी संधी देण्यात आली आहे.
गेलच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात दोन द्विशतक आहेत. अष्टपैलू खेळाडू आणि विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डरला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. हा सामना रविवारी भारताविरुद्ध सबिना पार्कवर होणार आहे.
भारताविरुद्ध एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यासाठी विंडीजचा संघ
कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युएल बद्री, रॉन्सफोर्ड बेटोन, ख्रिस गेल, इवीण लेविस, जेसन मोहम्मद, सुनील नारायण, किएरॉन पोलार्ड, रोमवमन पॉवेल, मार्लन सॅम्युएल, जेरॉम टेलर, चांदवीक वॉल्टन, क्सक्रिक विलियम्सन
https://www.instagram.com/p/BWIyoq6DQms/?taken-by=windiescricket