ख्रिस गेल आणि विराट कोहली हे दोन खेळाडू असे आहे, ज्यांनी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकली आहेत. गुरुवारी (दि. 18 मे) सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडलेल्या सामन्यात विराट कोहली याने शतक झळकावले. हे त्याचे आयपीएलमधील 6वे शतक ठरले. वेस्ट इंडिज आणि आरसीबीचा माजी खेळाडू ख्रिस गेल याने विराटचे आयपीएलमधील 6वे शतक झाल्यानंतर त्याचे आपल्या खास क्लबमध्ये स्वागत केले. विशेष म्हणजे, विराटपूर्वी गेल हा एकमेव फलंदाज होता, ज्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 शतके केली होती. आता विराटही ख्रिस गेलच्या क्लबमध्ये सामील झाला.
विराट कोहली (Virat Kohli) याने हैदराबादविरुद्ध खेळताना महत्त्वाच्या सामन्यात जवळपास 4 वर्षांनंतर एक शानदार शतक झळकावले. तसेच, आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. विराटने 63 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी साकारली. त्यामुळे आरसीबीने हैदराबादच्या 188 धावांचे आव्हान सहजरीत्या पार केले.
ख्रिस गेलच्या क्लबमध्ये विराट सामील
विराटने यापूर्वी आयपीएल 2019मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने 4 आयपीएल हंगाम खेळले, पण एकही शतक झळकावले नव्हते. आता आयपीएल 2023मध्ये विराटने शतकाचा दुष्काळ संपवला. त्याने हैदराबादविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात शतक झळकावत ख्रिस गेल (Chris Gayle) याच्या क्लबमध्ये एन्ट्री केली.
खरं तर, गेलने आयपीएलमध्ये 142 सामने खेळताना 6 शतके झळकावली होती. तसेच, विराटने 236 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. विराटने ही खास कामगिरी करताच त्याची प्रशंसा करताना गेल म्हणाला की, “मी या क्लबमध्ये एकटा होतो आणि खूप कंटाळलो होतो. मी खुश आहे की, माझा जुना संघ आरसीबीच्या सहकारी खेळाडूने योग्य वेळी आपला सर्वोत्तम फॉर्म मिळवला आहे. आता आयपीएल 2023 प्ले-ऑफची शर्यत एक रोमांचक शेवटाकडे जात आहे.”
विराट कोहलीचा आरसीबी संघ सध्या गुणतालिकेत 14 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना प्ले-ऑफमध्ये एन्ट्री करण्यासाठी पुढील सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत करावे लागेल. या हंगामात विराट सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यात 44.83च्या सरासरीने आणि 135.85च्या स्ट्राईक रेटने एकूण 538 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. (chris gayle welcomed virat kohli to his special club after scoring his sixth century in ipl know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वीबाबत सहाय्यक कोच वॉटसनचे खळबळजनक भाष्य; काय म्हणाला लगेच वाचा
IPLमधील वाद थांबेना! एकमेकांना भिडले हेटमायर अन् करन, पंजाब-राजस्थान लाईव्ह मॅचमध्ये मैदानावर पंगा