अफगाणिस्तानचा कर्णधार असलेल्या राशिद खानने यापुर्वी गयाना ऍमेझॉन वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. पण यावेळेस राशिदला २०१९ चा विजेता बार्बाडोस ट्रायडेट्सने आपल्या संघात सामावुन घेतले आहे. गयाना कडुन खेळताना राशिदने शानदार प्रदर्शन करत संघाच्या विजयात महत्त्वाची भुमिका निभावली होती तसेच सीपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रीक घेण्याचा मान सुद्धा राशिदच्याच नावावर आहे.
राशिदने जागतिक क्रिकेटमधील मोठ मोठ्या फलंदाजांची फिरकी घेतली आहे आणि तश्याच कामगिरीची अपेक्षा बार्बाडोसचा कर्णधार जेसन होल्डरला असेल. तसेच सामने ज्या ब्रायन लारा मैदानावर खेळवले जाणार आहेत त्या मैदानाचा जर इतिहास पाहिला तर त्या मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे.
त्यामुळे कोणता फिरकी गोलंदाज वरचढ ठरतो हेसुद्ध पाहावे लागेल. या सत्राच्या पहिल्याच सामन्यांत राशिद खान समोर उभे असणार ते पीएसल २०२० मध्ये शानदार फलंदाजी केलेला ख्रिस लिन व सीपीएल इतिहासात १५५२ धावा फटकावणारा एविन लुईस. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे पण राशिद खान या दोघांना सळो की पळो करुन सोडतो की लीन व लुईस, राशिदच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवतात हे पाहावे लागेल.