ऑस्ट्रेलियाचा तुफानी फलंदाज ख्रिस लिनला अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले आहे. ख्रिस लिन आता बिग बॅश लीग म्हणजेच बीबीएल तसेच संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई मध्ये खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये सहभागी होणार आहे. यूएईमधील या लीगचा हा पहिलाच हंगाम असेल. मात्र, ख्रिस लिन बीबीएलमध्ये केवळ ११ सामने खेळताना दिसणार आहे.
बीबीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा लिन याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी करार केला असून त्याला दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचा निर्णय घेतला आहे, जो परदेशी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार आवश्यक आहे. लिनने गेल्या आठवड्यात गल्फ जायंट्स संघाशी करार केला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकायचा असेल तर ‘ही’ गोष्ट आवर्जून करावी लागेल, माजी दिग्गजाने सांगितलंय
‘मी आश्चर्यचकित झालो आहे’, विराटच्या फलंदाजीवर राशिद खानची भन्नाट प्रतिक्रिया