---Advertisement---

पैसा वसूल! ख्रिस मॉरिसचा ‘नो लूक षटकार’, तोही रबाडाच्या चेंडूवर; एकदा Video पाहाच

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 8:33 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने बाजी मारली. या सामन्यात हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या राजस्थानच्या क्रिस मॉरिसने मारलेल्या एका षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने १४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघात नव्याने समाविष्ट झालेल्या क्रिस मॉरिसने दाखवून दिले की, तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू का आहे?.

मॉरिसने खालच्या फळीत फलंदाजीस येऊन १८ चेंडूत ३६ धावांची खेळी करत सामना राजस्थान रॉयल्स संघाला जिंकवून दिला. यामध्ये त्याने १९ व्या षटकात रबाडाला २ षटकार लावले. यातील दुसरा षटकार तर त्याने लेग साईडच्या दिशेने फ्लिक करत, ८८ मीटरचा नो लुक षटकार लगावला. या षटकाराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

https://twitter.com/ribas30704098/status/1382758504914571266?s=20

दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावत १४७ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार रिषभ पंतला वगळता इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. रिषभने ५१ धावांची खेळी केली. तर ललित यादवने २० धावांचे योगदान दिले. यासोबतच टॉम करनने २१ तर क्रिस वोक्सने १५ धावांचे योगदान दिले.

१४८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना देखील काही सुर गवसला नाही. संघातील मुख्य फलंदाज लवकर बाद होऊन माघारी परतले. डेविड मिलरने सर्वाधिक ६२ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटी क्रिस मॉरिसने येऊन षटकारांचा पाऊस पाडला आणि जणू मागच्या सामन्यातील बदला घेतला. त्याने १८ चेंडूत ३७ धावा आणि उनाडकटने ७ चेंडूत ११ धावा करून, हा सामना राजस्थान रॉयल्स संघाला जिंकवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

एका बाजूने विकेट्स जात असताना रिषभबरोबर अर्धशतकी भागिदारी करणारा ‘तो’ आहे तरी कोण? वाचा

सेलिब्रेशन तो बनता है! पंतला धावबाद करताच रियान परागचा भर मैदानात बिहू डान्स, व्हिडिओ व्हायरल

अरेरे! विस्फोटक फलंदाज भरलेल्या दिल्ली कॅपिटल्सवर आली ‘ही’ नामुष्की, वानखेडे स्टेडियमवर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---