---Advertisement---

पड्डीकलच्या फलंदाजीचा ‘हा’ धुंरधर अष्टपैलू झाला चाहता; म्हणतोय, ‘तो तर सेम मॅथ्यू हेडन’

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 5:05 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिसने संघसहकारी देवदत्त पड्डिकलच्या फलंदाजीची तोंडभरून प्रशंसा केली आहे. एवढेच नाही तर, त्याने युवा क्रिकेटपटू पड्डीकलच्या फलंदाजी शैलीची तुलना महान अष्टपैलू मॅथ्यू हेडनशी केली आहे.

मॉरिस म्हणाला की, “पड्डीकलने यावर्षी ऍरॉन फिंचसोबत मिळून दमदार फलंदाजी केली आहे. तो अगदी हेडनप्रमाणे फलंदाजी करतो. जरी तो शरीराने हेडनसारखा धडधाकट नसला, तरी त्याची चेंडूला हिट करण्याची पद्धत हेडनसारखीच आहे. पड्डीकल ज्याप्रकारे फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतो. त्याला पाहता नक्कीच तो भविष्यात खूप मोठं काही साध्य करुन दाखवेल.”

हेडनविषयी बोलायचं झाल तर, या फलंदाजी अष्टपैलू खेळाडूने २००८-१० दरम्यान एकूण ३७ आयपीएल सामने खेळले होते. त्यात त्याने ३६.९च्या सरासरीने ११०७ धावा कुटल्या होत्या. यात त्याच्या एका डावातील सर्वाधिक ९३ धावांचा समावेश होता. तर, पड्डीकलने आयपीएलच्या तेराव्या हंगामात ११ सामने खेळले असून त्यात ३२.१०च्या सरासरीने ३४३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण

चेंडू आहे की बंदुकीची गोळी! नॉर्किएने फेकलेल्या योर्करवर त्रिपाठी क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

दिल्लीच्या फलंदाजांना लोळवणारा मिस्ट्री स्पिनर तुम्हाला माहित आहे का? पहिल्यांदाच घेतल्यात ५ विकेट्स

ट्रेंडिंग लेख-

कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

IPL च्या १३ व्या हंगामात ‘हे’ ५ मॅच विनर खेळाडू ठरले सुपर फ्लॉप; पहिला क्रमांक आश्चर्यकारक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---