---Advertisement---

टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सने केला खास विक्रम

---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने शनिवारी (11 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 बाद 357 धावा केल्या असून 250 धावांची आघाडी घेतली आहे.

इंग्लंडकडून या डावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने शतक केले. त्याचे हे कसोटीतील पहिलेच शतक आहे. त्याचबरोबर त्याने लॉर्ड्सवर असणाऱ्या मानाच्या आॅनर्स बोर्डवर शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही स्थान मिळवले आहे.

यामुळे तो लॉर्ड्सच्या आॅनर्स बोर्डवर गोलंदाजांच्या आणि फलंदाजांच्या अशा दोन्ही यादीत नाव कोरणारा एकूण 10 वाच खेळाडू ठरला आहे. या 10 खेळाडूंमध्ये 8 इंग्लंडचे तर आॅस्ट्रेलिया आणि भारताचा प्रत्येकी एक खेळाडू आहे.

लॉर्ड्सच्या आॅनर्स बोर्डवर एखाद्या खेळाडूने या मैदानावर शतक किंवा सामन्याच्या एका डावात 5 विकेट्स आणि एका सामन्यात 10 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव या बोर्डवर कोरले जाते.

त्यामुळे याआधी वोक्सने या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध 14 ते 17 जुलै 2016 दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात 11 विकेट्स घेतले असल्याने त्याचे नाव आॅनर्स बोर्डवर गोलंदाजांच्या यादीत लिहिले गेले होते.

त्याने शनिवारी भारताविरुद्ध तिसऱ्या दिवसाखेर 159 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या आहेत. यात त्याने 18 चौकार मारले आहेत.

लॉर्ड्सच्या आॅनर्स बोर्डवर गोलंदाजांच्या आणि फलंदाजांच्या अशा दोन्ही यादीत नाव कोरणारे खेळाडू – 

गब्बी ऍलन – इंग्लंड

इयान बॉथम – इंग्लंड

स्टुअर्ट ब्रॉड – इंग्लंड

अँड्र्यू फ्लिंटॉफ – इंग्लंड

रिचर्ड इलिंगवर्थ – इंग्लंड

विनू मांकड – भारत

किथ मिलर – आॅस्ट्रेलिया

बेन स्टोक्स – इंग्लंड

ख्रिस वोक्स – इंग्लंड

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

किरॉन पोलार्डच्या बाबतीत झाला आहे हा खास योगायोग

सौरव गांगुली होणार बीसीसीआयचा अध्यक्ष?

अँडरसनचा तो चेंडू खेळायचा कसा? हरभजनचा सचिन तेंडुलकरला प्रश्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment