१६ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक २०२२ खेळले जाणार आहे. तत्पूर्वी इंग्लंड संघासाठी चिंताजनक बातमी पुढे येत आहे. इंग्लंडचा धाकड अष्टपैलू ख्रिस वोक्स हा वर्षाअंती होणाऱ्या टी२० विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे तो या स्पर्धेत सहभागी होण्यावर शंका आहे. वोक्सने यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंडकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर सातत्याने गुडघ्याच्या दुखण्यामुळे तो संघातून बाहेर आहे.
मार्च महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतल्यानंतर वोक्सच्या गुडघ्याला सूज आली होती. अशात काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा मैदानावर उतरण्यास पात्र बनू असे वोक्सला वाटले होते. परंतु त्याच्या गुडघ्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे त्याच्या प्रदर्शनावरही परिणाम दिसत आहे. म्हणून वोक्सने त्याच्या सर्जनच्या सल्ल्यानंतर गुडघ्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु यामुळे इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढू शकते. वोक्स इंग्लंडच्या तिन्ही क्रिकेट स्वरूपातील संघांचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या गोलंदाजी विभागातील उपलब्धतेमुळे संघाला भरपूर मदत मिळते.
वोक्सबरोबरच शाकिब महमूद, जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड हेदेखील दुखापतग्रस्त असून त्यांचेही यंदाच्या टी२० विश्वचषकात खेळणे कठीण आहे. अशात जर वोक्स सर्जरीमुळे टी२० विश्वचषकातून बाहेर पडला तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी विभाग कमकुवत होईल. इंग्लंडचा संघ सध्या ज्या वेगवान गोलंदाजी विभागासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, तोदेखील जास्त अनुभवी नाही. नुकतेच इंग्लंडच्या संघात काही नव्या वेगवान गोलंदाजाचे आगमन झाले आहे. तर काही जुने गोलंदाज आहेत.
सध्या इंग्लंडच्या टी२० संघात ख्रिस जॉर्डन सर्वाधिक अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियातील मैदाने वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असतात. अशात ख्रिस वोक्ससारखा गोलंदाज ज्याच्याकडे मैदानानुसार चेंडूला हलवण्याची क्षमता आहे. तर त्या संघाची गोलंदाजी आपोआप मजबूत बनते. सध्यातरी इंग्लंडचे संघ व्यवस्थापन वोक्स सर्जरीनंतर काही दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमानंतर बरा होऊन टी२० विश्वचषक निवडीसाठी उपलब्ध राहिल, असी अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित आणि द्रविडने स्वत: जाऊन खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराटशी बोलायला पाहिजे”
तुला माही म्हणू की माही भाई? जेव्हा उथप्पाने धोनीलाच विचारला होता प्रश्न; मिळाले होते असे उत्तर
जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…