ऍशेस 2023 मालिकेतील मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने चौथ्या दिवशीच विजय मिळवत मालिकेत दमदार पुनरागमन केले. या विजयासह इंग्लंडने मालिकेतील आव्हान कायम ठेवले. तीन सामन्यानंतर ही मालिका आता ऑस्ट्रेलियाच्या बाजूने 2-1 अशी आहे. या मालिकेत प्रथमच खेळत असलेल्या इंग्लंडच्या अष्टपैलू ख्रिस वोक्स यांनी इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
इंग्लंडला या सामन्यात अखेरच्या डावामध्ये विजयासाठी 251 धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने उत्कृष्ट फलंदाजी केली. मात्र, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांना बाद करत ऑस्विट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्याचवेळी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वोक्सने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या सामना करताना अखेरपर्यंत नाबाद राहत 47 चेंडूवर 32 धावा केल्या.
पहिल्या दोन कसोटीत संघाचा भाग नसलेल्या वोक्सने या सामन्यातून पुनरागमन केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने 10 धावा केलेल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना उस्मान ख्वाजा, पहिल्या डावातील शतकवीर मिचेल मार्श व ऍलेक्स केरी यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता अखेर चढावात नाबाद खेळी करत त्याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
वोक्स मागील काही काळापासून इंग्लंडच्या कसोटी संघाचा भाग नव्हता. पहिल्या दोन सामन्यात खेळलेल्या अनुभवी जेम्स अँडरसन याच्या जागी त्याला या सामन्यात संधी मिळालेली. त्याने ही मॅचविनिंग कामगिरी करत पुन्हा एकदा संघातील आपले स्थान राखले.
(Chris Woakes Shines In England Win At Headingley In Ashes 2023)
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका बनली क्वालिफायर्स चॅम्पियन! अंतिम सामन्यात उडवला नेदरलँड्सचा खुर्दा
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान