जगातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (31 जुलै) समाप्त झाला. ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन करत, 49 धावांनी विजय साजरा केला. यासह पाच सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत समाप्त झाली. मालिकेतील तीनच सामने खेळणाऱ्या इंग्लंडच्या ख्रिस वोक्स याला इंग्लंडचा मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड होते. चौथ्या दिवशी नाबाद असलेल्या डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा या सलामी जोडीला दिवसाच्या सुरुवातीला तंबूत पाठवण्याचे काम त्याने केले. त्यानंतर अर्धशतक करत ऑस्ट्रेलियाला विजयाकडे नेणाऱ्या स्टीव्ह स्मिथ याला देखील त्यानेच बाद केले. तर मिचेल स्टार्क याला बाद करून त्याने ऑस्ट्रेलियाला सामन्यातून जवळपास बाहेर केले.
वोक्स याला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी इंग्लंड संघात संधी मिळाली नव्हती. या दोन्ही सामन्यात इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने संघात पुनरागमन करताच इंग्लंडचे नशीब बदलले. त्याने कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी तीन बळी मिळवत तसेच दुसऱ्या डावात नाबाद 32 धावांची खेळी करत इंग्लंडला विजयी केले. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात एक बळी मिळवला. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ न झाल्याने इंग्लंड या सामन्यात विजयापासून वंचित राहिला.
त्यानंतर आता अखेरच्या कसोटीत देखील त्याने एकूण 7 बळी घेत इंग्लंडच्या विजयात हातभार लावला. मालिकेत 83 धावा 19 बळी मिळवल्याने त्याला इंग्लंडसाठी मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
(Chris Wowkes Won Man Of The Series For England In Ashes 2023 Just Played 3 Matches)
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’