शुक्रवारी (०४ मार्च) क्रिकेटविश्वातून एक हादरवणारी बातमी पुढे आली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन (Shane Warne Died By Heart Attack) झाले. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी अचानक वॉर्नने जगाचा निरोप घेतल्यामुळे (Shane Warne Died) क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. जगभरातून त्याला श्रद्धांजली वाहिली जात (Fans Remembered Shane Warne) आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमी वॉर्नच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडबाहेरील त्याच्या पुतळ्यापुढे जमा झाल्याचे दिसले.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडबाहेर वॉर्नचा एक मोठा पुतळा आहे. त्याच्या निधनानंतर क्रिकेटप्रेमींनी त्याच्या आठवणीत पुतळ्याला भेट दिली आणि श्रद्धांजली वाहिली आहे. या पुतळ्यापुढे चाहत्यांनी वॉर्नच्या आवडीच्या गोष्टीही ठेवत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये काहींनी बीयर, काहींनी सिगरेट, काहींनी मीट पाइ, तर काहींनी फूल वाहत त्यांच्या नायकाला श्रद्धांजली दिली आहे.
याखेरीज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी सकाळी (०५ मार्च) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या द ग्रेट सदर्न स्टँडला वॉर्नचे नाव दिली गेली असल्याची घोषणा केली आहे. आता हे स्टँड एसके वॉर्न स्टँड म्हणून ओळखले जाईल. ही दिवंगत सर्वकालीन महान फिरकीपटू वॉर्नला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेली दीर्घकालीन श्रद्धांजली आहे.
Beers and tears flow in tribute to the King as MCG stand renamed for the great Shane Warne: https://t.co/bVRgSkme44 pic.twitter.com/TP1cVFHlAf
— cricket.com.au (@cricketcomau) March 5, 2022
क्रिकेटपटूंनीही वॉर्नला वाहिली श्रद्धांजली
याखेरीज क्रिकेटपटूंनी हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधत तसेच काही मिनिटांचा मौन पाळत वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एका मिनिटाने मौन ठेवत वॉर्नला श्रद्धांजली दिली. तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. असेच काहीसे चित्र भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मोहाली येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानही पाहायला मिळाले. याखेरीज महिला विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यातही वॉर्नला श्रद्धांजली वाहिली गेली.
शेन वॉर्नचे असे झाले आकस्मिक निधन
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि सर्वकालीन महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. वॉर्नच्या व्यवस्थापकांनी एक संक्षिप्त विधान प्रसिद्ध केले आहे. ज्यात, ‘थायलंडमधील कोह सामुई येथे शेन वॉर्नचे निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला.’ असे निवेदनात म्हटले आहे.
‘शेन वॉर्न अटॅक आल्याने घरामध्येच पडला होता. वैद्यकीय कर्मचारी आणि स्टाफने त्याच्यावर घरातच उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वॉर्नने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय कर्मचार्यांनी सर्वोत्तम प्रयत्न करुनही त्याला वाचवता आले नाही.’ असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘रोहितसेना’ने १००वी कसोटी खेळत असलेल्या विराटला दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’, कोहलीनेही मानले सर्वांचे आभार
दक्षिण आफ्रिका महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी; बांगलादेशला चारली धूळ
एकाच दिवशी तब्बल पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात वाहिली गेली वॉर्नला श्रद्धांजली; रोहित-विराट म्हणाले…