पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक महाराष्ट्र प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत रोहित चौधरी, मुनमुन मुखर्जी, नितीन तोष्णीवाल, अनघा जोशी, प्रकाश केळकर, सुहासिनी बाकरे, सतीश कुलकर्णी, पिनाकीन संपत, सुबोध देशपांडे या खेळाडूंनी आपापल्या गटांतील प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. तर, सांघिक गटात उषाप्रभा ट्रांसलाईन्स संघाने पीवायसी अ संघाचा 3-2असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले.
पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष 40 वर्षावरील गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित पुण्याच्या रोहित चौधरी याने सोलापूरच्या अव्वल मानांकित मनीष रावतचा 11/2, 11/7, 9/11,9/11,11/4असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तर, महिला गटात मुंबई शहरच्या मुनमुन मुखर्जीने पुण्याच्या दुसऱ्या मानांकित चंद्रमा रामकुमारचा 11/6,11/7,11/5असा पराभव करून विजय मिळवला.
50वर्षावरील पुरुष गटात सोलापूरच्या नितीन तोष्णीवालने अव्वल मानांकित पुण्याच्या सुनील बाब्रसला 11/7,12/14,11/5असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद मिळवले. महिला गटात मुंबई शहरच्या अनघा जोशीने ठाण्याच्या तृप्ती माचवेचे आव्हान 11/7,11/6,11/4असे मोडीत काढत विजेतेपद मिळवले. 60वर्षावरील पुरुष गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित प्रकाश केळकरने पुण्याच्या तिसऱ्या मानांकित अविनाश जोशी यांचा 11/5,11/9,11/7 असा, तर महिला गटात पुण्याच्या सुहासिनी बाकरेने मुंबई शहरच्या मंगला सराफचा 11/4,3/11, 11/6,11/7असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
65वर्षावरील पुरुष गटात मुंबई शहरच्या सतीश कुलकर्णीने आपला शहर सहकारी योगेश देसाईचा 13/11,5/11, 11/4,6/11,11/6असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 70वर्षावरील गटात अंतिम फेरीत मुंबई शहरच्या पिनाकीन संपतने पुण्याच्या विकास सातारकरचा 11/8,12/14, 11/3,11/9 असा तर, 75वर्षावरील गटात पुण्याच्या अव्वल मानांकित सुबोध देशपांडे मुंबई उपनगरच्या आर राव यांचा 11/6,11/6,11/6असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
सांघिक गटात अंतिम फेरीच्या लढतीत उषाप्रभा ट्रांसलाईन्स संघाने पीवायसी अ संघाचा 3-2असा पराभव करून विजेतेपद मिळवले. विजयी संघाकडून पंकज रहाणे, दिव्यांदू चांदुरकर यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्या मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी क्लबच्या टेबल टेनिस विभागाचे सचिव गिरीश करंबेळकर, पीवायसी क्लबचे वसंत चिंचाळकर, महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्ष स्मिता बोडस, संयोजन सचिव अविनाश जोशी, दीपक हळदणकर, मधुकर लोणारे, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे, राहुल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष 40वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
मनीष रावत(सोलापूर)[1]वि.वि.केदार मोघे(पुणे)11/6,13/11,11/6;
रोहित चौधरी(पुणे)[7]वि.वि.पंकज रहाणे(नाशिक)7/11,11/6,11/5,7/11,11/8;
अंतिम फेरी:रोहित चौधरी(पुणे)[7]वि.वि.मनीष रावत(सोलापूर)[1]11/2, 11/7, 9/11,9/11,11/4
महिला 40वर्षावरील गट: अंतिम फेरी:
मुनमुन मुखर्जी(मुंबई शहर)वि.वि.चंद्रमा रामकुमार(पुणे)[2]11/6,11/7,11/5
पुरुष 50वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
सुनील बाब्रस(पुणे)[1]वि.वि.विवेक अल्वानी(जळगाव)[5]11/8,12/10,7/11,13/11
नितीन तोष्णीवाल(सोलापूर)वि.वि.राम कदम(मुंबई शहर)[2]11/7,11/6,11/2
अंतिम फेरी: नितीन तोष्णीवाल(सोलापूर)वि.वि.सुनील बाब्रस(पुणे)[1]11/7,12/14,11/5
महिला 50वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
तृप्ती माचवे(ठाणे)वि.वि.सरिता कोरडे(मुंबई शहर)[8]11/7,11/6,15/13
अनघा जोशी(मुंबई शहर)[3]वि.वि.वैशाली मालवणकर(मुंबई शहर)11/9,11/3,11/4
अंतिम फेरी: अनघा जोशी(मुंबई शहर)[3]वि.वि.तृप्ती माचवे(ठाणे)11/7,11/6,11/4
पुरुष 60वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
प्रकाश केळकर(मुंबई उपनगर)[1]वि.वि.नंदकुमार जगताप(पुणे)[13]11/5,11/8,11/4
अविनाश जोशी(पुणे)[3]वि.वि.उमेश कुंभोजकर(नाशिक)11/7,11/5,11/7
अंतिम फेरी: प्रकाश केळकर(मुंबई उपनगर)[1]वि.वि.अविनाश जोशी(पुणे)[3]11/5,11/9,11/7
महिला 60वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
मंगला सराफ(मुंबई शहर)[1]वि.वि.ज्योती कुलकर्णी(नाशिक)[4]11/9,11/5,11/5
सुहासिनी बाकरे(पुणे)वि.वि.राजेश्वरी मेहेत्रे(मुंबई शहर)[2]11/4,11/6,11/6
अंतिम फेरी:सुहासिनी बाकरे(पुणे)वि.वि.मंगला सराफ(मुंबई शहर)[1]11/4,3/11, 11/6,11/7
पुरुष 65वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
योगेश देसाई(मुंबई शहर)[1]वि.वि.दिलीप कुडतरकर(पुणे)[4]11/8,11/9,11/6
सतीश कुलकर्णी(मुंबई शहर)[6]वि.वि.बाळकृष्ण काटदरे(पुणे)[7]11/2,11/2,11/9
अंतिम फेरी: सतीश कुलकर्णी(मुंबई शहर)[6]वि.वि.योगेश देसाई(मुंबई शहर)[1]13/11,5/11, 11/4,6/11,11/6
पुरुष 70वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
विकास सातारकर(पुणे)[1]वि.वि.एम बेग(पुणे)11/8,13/11,12/10
पिनाकीन संपत(मुंबई शहर)वि.वि.एस.एस.हुसेन(सोलापूर)11/4,11/3,11/2
अंतिम फेरी:पिनाकीन संपत(मुंबई शहर)वि.वि.विकास सातारकर(पुणे)[1]11/8,12/14, 11/3,11/9
पुरुष 75वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
सुबोध देशपांडे(पुणे)[1]वि.वि.सुधाकर बाब्रस(ठाणे)[4]11/4,11/5,11/6
आर राव(मुंबई उपनगर)[2]वि.वि.परवेज दावर(मुंबई शहर)[3]7/11,11/7,14/12,11/7
अंतिम फेरी: सुबोध देशपांडे(पुणे)[1]वि.वि.आर राव(मुंबई उपनगर)[2]11/6,11/6,11/6
सांघिक गट: उपांत्य फेरी:
पीवायसी अ वि.वि.केआरसी अ 3-0(एकेरी: शेखर काळे वि.वि.तेजस नाईक 10/12,8/11, 11/7,11/9,11/3; उपेंद्र मुळ्येवि.वि.सुहास राणे 11/8,11/7,11/6; दुहेरी: दीपेश अभ्यंकर/उपेंद्र मुळ्ये वि.वि.सुहास राणे/योगेश देसाई 11/5,11/6, 11/8);
उषाप्रभा ट्रांसलाईन्स वि.वि.किंग पॉंग 3-1(एकेरी: पंकज रहाणे वि.वि. विवेक भार्गवा 11/9,10/12,11/8,11/6; दिव्यांदू चांदुरकर पराभूत वि.रोहित चौधरी 9/11,8/11,12/14; दुहेरी: पंकज रहाणे/दिव्यांदू चांदुरकर वि.वि.विवेक भार्गवा/रोहित चौधरी 13/11,7/11,11/7,11/6; एकेरी: पंकज रहाणे वि.वि.रोहित चौधरी 11/9,10/12,10/12,11/4,11/9);
अंतिम फेरी: उषाप्रभा ट्रांसलाईन्स वि.वि.पीवायसी अ 3-2(एकेरी: दिव्यांदू चांदुरकर पराभूत वि.उपेंद्र मुळ्ये 11/7, 6/11, 11/9, 12/14, 7/11; पंकज रहाणे वि.वि.शेखर काळे 11/6, 11/9, 11/3;दुहेरी: पंकज रहाणे/दिव्यांदू चांदुरकर वि.वि.उपेंद्र मुळ्ये/दीपेश अभ्यंकर 11/7, 7/11, 11/7, 9/11, 13/11; एकेरी: पंकज रहाणे पराभूत वि.उपेंद्र मुळ्ये 6/11, 10/12, 15/17; दिव्यांदू चांदुरकर वि.वि.शेखर काळे 11/5, 7/11, 5/11, 11/6, 11/5).