---Advertisement---

IND vs ENG: मैदानावर जडेजा-ब्रायडन कार्स यांच्यात जोरदार वाद, कर्णधार स्टोक्सला करावी लागली मध्यस्थी

On: सोमवार, जुलै 14, 2025 6:38 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात लॉर्ड्स मैदानावर चाललेला तिसरा कसोटी सामना खूपच रोचक टप्प्यावर आला आहे. पाचव्या दिवशी भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. रिषभ पंत (Rishbh Pant) काही विशेष खेळी करू शकला नाही आणि फक्त 9 धावा करून बाद झाला. जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) त्याला क्लीन बोल्ड केलं आणि पॅव्हिलियनकडे परत पाठवलं. त्यानंतर के एल राहुलही (KL Rahul) 39 धावा करून माघारी गेला. वॉशिंगटन सुंदरलाही (Washington Sundar) आर्चरने खाते न उघडता बाद केलं. सलग तीन विकेट मिळवून इंग्लंडची टीम सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसली.

सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स आणि (Brydon carse & Ravindra Jadeja) रविंद्र जडेजा यांच्यात मैदानावरच वाद झाला. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि इंग्लंडचा कर्णधां बेन स्टोक्सने (Ben Stocks) मधे पडून दोघांना वेगळं केलं.

सकाळच्या पहिल्या तासातच इंग्लंडने भारताचे तीन महत्वाचे फलंदाज बाद केले आणि सामन्यात पकड मजबूत केली. रविंद्र जडेजा आणि नीतीश कुमार रेड्डी डाव सावरत होते. डावाच्या 35व्या षटकात कार्सच्या चेंडूवर जडेजाने शॉट खेळला आणि रनसाठी धावला. जडेजाचं लक्ष फक्त चेंडूकडे होतं आणि त्याने समोर उभा असलेला कार्स पाहिला नाही. त्यामुळे त्यांच्यात थेट धडक झाली. धडकेनंतर कार्स जडेजावर रागावून काही बोलला. जडेजाही कार्सकडे जात आपलं म्हणणं सांगू लागला. वाद वाढताना पाहून कर्णधार स्टोक्सला मधे पडून शांतता राखावी लागली.

पाचव्या दिवशी इंग्लंडचे खेळाडू वारंवार भारतीय फलंदाजांना मानसिक दबावात आणण्याचा प्रयत्न करत होते. या दिवशी सुरुवातीलाच आर्चरने उत्कृष्ट चेंडू टाकून पंतला क्लीन बोल्ड केलं. पंत बाद झाल्यानंतर फक्त 10 धावा जोडल्या गेल्या होत्या, तेवढ्यात के.एल. राहुलही 39 धावा करून स्टोक्सचा बळी ठरला. लगेच एक धावा झाल्यावर आर्चरने सुंदरलाही शून्यावर बाद केलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---