---Advertisement---

याला म्हणतात जिगरा! चेंडू टाकताच पळत सुटला गोलंदाज, फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता; पाहा व्हिडिओ

Clint-Hinchliffe-Catch
---Advertisement---

क्रिकेट म्हटलं की, त्यात डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या घटना या घडतच असतात. कधी कुठला फलंदाज स्टेडिअमच्या बाहेर चेंडू मारतो, कधी कुठला गोलंदाज निर्धाव षटक टाकतो, तर कधीकधी हॅट्रिक घेऊन सर्वांच्या भुवया उंचावतो. यासोबतच काही असेही खेळाडू असतात, जे फलंदाजी आणि गोलंदाजी न चमकताही क्षेत्ररक्षणातून आपली चपळता दाखवून देतात. ते सर्वात कठीण झेलही झेलतात. असेच काहीसे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग 2023 स्पर्धेतील एका सामन्यात पाहायला मिळाले.

सोमवारी (दि. 16 जानेवारी) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर मेलबर्न स्टार्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट (Melbourne Stars vs Brisbane Heat) संघात स्पर्धेतील 44वा सामना पार पडला. हा सामना हीट संघाने 3 विकेट्सने खिशात घातला. या सामन्यातील कामगिरीसाठी मॅट रेनशॉ (Matt Renshaw) याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे असले, तरीही स्टार्स संघाचा गोलंदाज क्लिंच हिंचलिफ (Clint Hinchliffe) याने घेतलेल्या झेलाने सर्वांचे लक्ष वेधले.

या सामन्यात मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघाने ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) संघासमोर 160 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हीट संघाने 7 विकेट्स गमावत शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गाठले. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना रेनशॉने चौकार मारत संघाला विजयी केले. मात्र, हीट डावाच्या सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हिंचलिफने घेतलेल्या झेलाची चर्चा रंगली आहे.

मेलबर्न स्टार्सचा गोलंदाज हिंचलिफ हा सहावे षटक टाकत होता. तसेच, स्ट्राईकवर मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) होता. हिंचलिफने पहिला चेंडू टाकताच, तो चेंडू लॅब्युशेनच्या बॅटवर जाऊन लागला आणि हवेत उंच उडाला. हिंचलिफने एकही क्षणाचा विलंब न करता विकेटसाठी चेंडूच्या मागे धाव घेतली आणि तो झेलला. यावेळी त्याने त्याचे लक्ष चेंडूवरच ठेवले होते. त्यामुळे त्याला हा कठीण झेल घेण्यात यश आले. आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, बिग बॅश लीगमध्ये अनेक शानदार झेल पाहायला मिळाले आहेत. यापूर्वीही मायकल नेसेर याने अद्भूत झेल घेतला होता. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, त्या झेलाविषयी बाचाबाचीही झाली होती. (clint hinchliffe stunning catch in big bash league see video here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ही नव्या युगाची नांदी! महिला आयपीएलला करोडो मिळाल्याने पोरी झाल्या खूश; म्हणाल्या…
निवृत्तीनंतरही उथप्पाने दाखवला दम! कॅपिटल्ससाठी अवघ्या इतक्या चेंडूत केली 79 धावांची वादळी खेळी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---