गेवराई । नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धैसाठी महाराष्ट्राचा संघ तयार करण्यासाठी एनआयएस कोच प्रा. डॉ.केतन कैलासराव गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने संघ प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
दिल्ली येथे ३ ते ९ जाने. २०१८ दरम्यान आयोजित राष्ट्रीय शालेय १९ वर्ष वयोगट कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
त्यापैकी मुलांच्या संघाची स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर औरंगाबाद येथे विभागीय क्रीडा संकुलावर २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
या शिबिरात १९ वर्षाआतील मुलांच्या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे अधिव्याख्याता प्रा.डॉ.केतन गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संघाची तयारी करून १ जानेवारी रोजी दिल्लीला जाणाऱ्या संघासमवेत प्रा.केतन गायकवाड प्रशिक्षक म्हणून जाणार आहेत.
गायकवाड हे गेवराई येथे शारदा स्पोर्टस अॅकॅडमीमध्ये राज्यातील व राज्याबाहेरील विविध जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की
–१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत
–जसप्रीत बुमराह कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज