कधीकधी क्रिकेटच्या मैदानावर अशा घटना घडतात किंवा अशी दृश्ये पहायला मिळतात जातात, जी पाहून तुम्ही तुमचे हसू थांबवू शकत नाही. असेच एक दृश्य कॅरेबियन प्रीमीयर लीग टी20 (सीपीएल) स्पर्धेच्या एका सामन्या दरम्यान दिसले. खरं तर, सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान, एक कोंबडा मैदानात घुसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सीपीएलच्या आठव्या सामन्यात सेंट किट्सच्या डावादरम्यान हे दृश्य पाहायला मिळाले. सेंट किट्सच्या डावाचे दहावे षटक संपल्यानंतर कॅमेरामनची नजर कोंबड्यावर पडली. मैदानावर कोंबडी पाहून समालोचक आणि खेळाडू देखील आश्चर्यचकित झाले. कॅमेरामन आपल्या कॅमेऱ्यात कोंबड्याची हालचाल टिपत राहिला. व्हिडिओमध्ये, कोंबडा मैदानावर सुरेख आणि ऐटीत चालताना दिसत आहे. लोकांना व्हिडिओ खूप आवडत आहे.
Pitch invader 🐓#SKNPvGAW #CPL21 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/UzG1HO5dgR
— CPL T20 (@CPL) August 29, 2021
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सेंट किट्सचा संघ हा सामना 6 गडी राखून जिंकण्यात यशस्वी झाला. गयाना वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गयानाच्या संघाने 20 षटकांत 3 गडी बाद 166 धावा केल्या, ज्यामध्ये मोहम्मद हाफिजने 70 धावा केल्या. याशिवाय हेटमायरने 52 धावा केल्या. पण गयानाचा संघ लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरला.
सेंट किट्स संघाने 19.2 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. सेंट किट्सकडून शेरफेन रदरफोर्डने 34 चेंडूत 59 धावांची खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार ब्राव्होने 22 धावांची खेळी खेळली.
पाकिस्तानचा मोहम्मद हाफिजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गयाना ऍमेझॉन वॉरियर्सकडून खेळणारा 40 वर्षीय पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिजने 59 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली आहे. त्याच्या संघाने उभारलेल्या 166 धावांच्या धावसंख्येत त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. हाफिजने तिसऱ्या विकेटसाठी शेमरॉन हेटमायरसोबत 67 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली.
हाफिजसह भागीदारी दरम्यान हेटमायरने एका टोक लावून धरले होते. हाफिजने या भागीदारीत 32 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. त्याने त्याच्या 70 धावांच्या खेळीदरम्यान 7 चौकार आणि एक षटकार ठोकला.
महत्त्वाच्या बातम्या –
जगात ५००० पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच