आज (2 एप्रिल) बरोबर 12 वर्षे झाली, भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी आयसीसीचा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. 30 वर्षीय एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा केला होता. या सामन्यात एक गोष्ट अशी घडली होती की, ज्यामुळे श्रीलंका संघाचा तेव्हाचा कर्णधार कुमार संगकारा हा भारतीयांसाठी व्हिलन ठरला होता. या घटनेमुळे संगकाराच्या कारकिर्दीवर एक डाग नक्की लागला होता.
जेव्हा या दिवस-रात्र झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेक केली होती तर संगकाराने हेड असे बोलल्याचे त्याचे म्हणणे होते. या सामन्यात भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा हे सामनाधिकारी जेफ क्राॅउनबरोबर नाणेफेकीला आले होते, तेव्हा समालोचक म्हणून सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) जबाबदारी पार पाडत होते.
जेव्हा पहिल्यांदा नाणेफेक झाली, तेव्हा कुमार संगकारा हा अतिशय हळू आवाजात हेड किंवा टेल यापैकी काहीतरी बोलला होता. यामुळे धोनीला तो टेल असे बोलला असे वाटले, तर संगकाराचे म्हणणे होते की तो हेड असे बोलला. त्यामुळे धोनी लगेच शास्त्री यांच्या जवळ जाऊन ‘वी वील बॅट फर्स्ट’ असे म्हणाला होता.
परंतु, सामनाधिकारी जेफ क्राॅउन तसेच समालोचक रवी शास्त्री यांना संगकारा काय बोलला हे ऐकूच गेले नव्हते. जेव्हा शास्त्री यांनी सामनाधिकारी जेफ क्राॅउन यांच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांनी आपण संगकारा काय म्हटला हे ऐकलेच नसल्याचे सांगितले.
शास्त्री यांच्या मते पहिल्यांदा नाणेफेक झाली, तेव्हा नाणे हे हेड बाजूने पडले होते. परंतु, संगकारा काय म्हणाला हे त्यांना ऐकू आले नव्हते.
@apuk79 could be juicy at end of game – Sangakkara seemed to indicate Dhoni had won toss but Crowe called for re-toss coz he hadn't heard!
— Alison Mitchell (@AlisonMitchell) April 2, 2011
Strangely subdued Dhoni. Lost toss. Steely Sangakkara. Sreesanth in the side. Bad feeling in my gut.
— Tunku Varadarajan (@tunkuv) April 2, 2011
त्यामुळे बरीच चर्चा झाली आणि अखेर नाणेफेक पुन्हा करण्याचा निर्णय झाला. यावेळी संगकारा हेड असे बोलला आणि त्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड श्रीलंकेतील पहिल्या टी-20चा रोमांचक शेवट, 17 वर्षांनी मिळवला ‘असा’ विजय
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्यांमध्ये शार्दुल ठाकूरचंही नाव, पाहा संपूर्ण यादी