Colin Munro 99 BBL 13: सध्या जगभरात क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणात खेळल्या जात आहेत. अशातच गुरुवारपासून (दि. 7 डिसेंबर) ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग 2023-24 स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ब्रिस्बेन हीट विरुद्ध मेलबर्न स्टार्स आमने-सामने आहेत. या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाचा विस्फोटक फलंदाज कॉलिन मुन्रो याने जबरदस्त फलंदाजी करत आपल्या संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला यावेळी शतक करण्यासाठी फक्त 1 धाव कमी पडली.
एक धावेने हुकले शतक
झाले असे की, मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघाने यावेळी नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी ब्रिस्बेनने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 214 धावांचा डोंगर उभा केला. यावेळी ब्रिस्बेनकडून न्यूझीलंड संघाचा फलंदाज कॉलिन मुन्रो (Colin Munro) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 61 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.
99* BY COLIN MUNRO…!!!
What a way to kick off the Big Bash League – a tremendous 99* in 61 balls with 9 fours and 5 sixes by Munro. pic.twitter.com/pzlk6qXEto
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 7, 2023
मुन्रोची कारकीर्दीतील सहावी मोठी खेळी
कॉलिन मुन्रो याने मेलबर्न स्टार्सविरुद्ध साकारलेली नाबाद 99 धावांची खेळी ही, त्याच्या टी20 कारकीर्दीतील सहावी मोठी खेळी ठरली. विशेष म्हणजे, हा त्याचा 401वा टी20 सामना होता. त्याच्या पहिल्या 5 सर्वोत्तम खेळींमध्ये अव्वलस्थानी 2021मध्ये पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून खेळताना ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध साकारलेल्या नाबाद 114 धावांच्या खेळीचा समावेश आहे.
In his 400th T20 match, Colin Munro hits his 6th highest T20 score and his highest for the @HeatBBL pic.twitter.com/19fnoDVipc
— Adam Morehouse (@ACTCricketStats) December 7, 2023
त्यानंतर दुसऱ्या स्थानी 2017 साली न्यूझीलंड संघाकडून खेळताना भारताविरुद्ध केलेल्या नाबाद 107 धावांच्या खेळीचा समावेश आहे. पुढे 2018मध्ये न्यूझीलंडकडून खेळताना वेस्ट इंडिजविरुद्ध केलेली 104 धावांची शतकी खेळी तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, चौथ्या स्थानी 2017मध्ये न्यूझीलंडकडून खेळताना बांगलादेशविरुद्ध साकारलेली 101 धावांची खेळी आहे. यानंतर पाचव्या स्थानी 2016 साली सीपीएलमध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाकडून खेळताना गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाविरुद्ध केलेली नाबाद 100 धावांची शतकी खेळी आहे.
मुन्रो मेलबर्नला एकटाच नडला
मेलबर्न स्टार्सविरुद्ध एकट्या मुन्रोनेच 30 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 30 धावांचा आकडा पार करू शकला नाही. कर्णधार उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) 28 धावा करून बाद झाला. तसेच, मार्नस लॅब्युशेन 30 धावा, तर सॅम बिलिंग्स (18) आणि मॅक्स ब्रायंट (नाबाद 18) यांनी छोटेखानी खेळी केली.
मेलबर्नकडून गोलंदाजी करताना कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), नेथन कुल्टर नाईल आणि जोएल पॅरिस यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (Colin Munro stranded on 99 in 1st Match of BBL 2023-24 Brisbane Heat vs Melbourne Stars)
हेही वाचा-
नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! सामना गमावला, पण नावावर केला विश्वविक्रम, बनली जगातली पहिली फलंदाज
India Tour of South Africa: टीम इंडिया आफ्रिकेत दाखल, डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले खेळाडू, पाहा Video