भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लंडनच्या के ओव्हल मैदानात सर्वात महत्त्वाचा डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. 08 जून) ऑस्ट्रेलिया संघ 469 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावत 151 धावा कुटल्या आहेत. खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली वाटत आहे, पण समालोचक आणि भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने विश्वास व्यक्त केला आहे की, एक गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी समस्या ठरू शकतो.
कोण आहे तो गोलंदाज?
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने ट्वीट करत लिहिले की, “मी जितके जास्त कसोटी सामने पाहतो, मला वाटते की, स्कॉट बोलँड भारतीय फलंदाजांसाठी सर्वात कठीण गोलंदाज असेल.”
The more I watch this test match , i feel SCOTT BOLAND will be the toughest bowler to face for the Indian batters #WTCFinal #WTCFinal2023 #CricketTwitter
— DK (@DineshKarthik) June 8, 2023
स्कॉट बोलँड (Scott Boland) उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. त्याने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट काढली आहे. त्याने शुबमन गिल (Shubman Gill) याला संघाची धावसंख्या 30 असताना त्रिफळाचीत बाद करून तंबूचा रस्ता दाखवला होता.
डब्ल्यूटीसीपूर्वी बोलँड याने आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. मात्र, आतापर्यंत भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यात त्यायला एकही विकेट घेता आली नव्हती. बोलँड याला जोश हेजलवूड याच्या जागी ताफ्यात स्थान मिळाले आहे.
बोलँडची शानदार आकडेवारी
स्कॉट बोलँड 34 वर्षीय असून त्याची आकडेवारी खूपच शानदार आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 2021च्या अखेरीस पदार्पण केले होते. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्याच्या चौथ्या डावात बोलँडने 4 षटकात 7 धावा खर्च करत 6 विकेट्स घेतल्या. यामध्ये जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांसारख्या खेळाडूंच्या विकेट्सचा समावेश होता. त्याने त्या डावात फक्त 19 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तो कसोटी इतिहासात सर्वात कमी चेंडूत 5 विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला आहे.
बोलँड याने त्याच्या 7 सामन्यात 13.42च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ही सरासरी 20व्या शतकातील सुरुवातीनंतर कमीत कमी 1 हजार चेंडू फेकणाऱ्या कोणत्याही कसोटी खेळाडूपेक्षा सर्वात कमी आहे. त्यामुळे तो भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. (commentator dinesh karthik feels this will be toughest bowler to face for indian batters wtc final 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video