कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये भारताचे टेबल टेनिसचे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे. अचंता शरथ कमल याने टेबल टेनिस पुरूषांच्या एकेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डला ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-८ असे पराभूत करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. त्याचे हे या हंगामातील तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे. तसेच त्याचे हे पुरूषांच्या एकेरीतील कॉमनवेल्थ गेम्सचे दुसरे सुवर्ण पदक आहे.
अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याने जिंकलेले हे सुवर्णपदक भारताचे हे कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासाटील टेबल टेनिस पुरूष एकेरीतील दुसरे सुवर्ण पदक ठरले आहे. तर सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समधील भारताचे हे २२वे सुवर्ण पदक आहे.
शरथने सोपा विजय मिळवला
लियाम पिचफोर्डने पहिला सेट १३-११ असा जिंकल्याने शरथ अडचणीत आला होता. तर शरथने दुसरा सेट ११-७ जिंकत सामना बरोबरीत आणला. शरथने दुसरा सेट जिंकल्यावर तिसऱ्या सेटमध्ये ११-२ असा एकतर्फी विजय मिळवला आहे. यामुळे त्याने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. नंतर त्याने शानदार प्रदर्शन करत पुढचे दोन्ही सेट सहज जिंकले.
🏓🥇 𝗚𝗢𝗟𝗗 𝗙𝗢𝗥 𝗧𝗛𝗘 𝗜𝗖𝗢𝗡! Sharath Kamal wins the gold medal in the Men's Singles event at the CWG after 1️⃣6️⃣ years.
👏 He has won a medal in every event that he has taken part in #B2022!
📸 Getty • #SharathKamal #TableTennis #B2022 #CWG2022 #TeamIndia #BharatArmy pic.twitter.com/8bJUhl5d9p
— The Bharat Army (@thebharatarmy) August 8, 2022
कॉमनवेल्थ गेम्समध्ये शरथ कमलची कामगिरी
टेबल टेनिसमध्ये १६ वर्षानंतर शरथने त्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. त्याने पुन्हा एकदा पुरूष एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. त्याने २००६च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच त्याने २०१८ आणि २०१०च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य जिंकले.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये ४० वर्षाच्या शरथने पहिलेच दोन पदके जिंकली आहेत. शरदने पुरुषांच्या दुहेरीमध्ये ज्ञानसेकरन साथियानसोबत रौप्य जिंकले आहे. तर मिश्र दुहेरीत श्रीजा अकुलाच्या साथीने अंतिम फेरीत मलेशियाच्या जावेन चुंग आणि कारेन लाईनला ११-४, ९-११, ११-५, ११-६ असे पराभूत केले.
भारताने या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदके जिंकली आहेत. यामुळे भारत ६१ पदकांसह पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाची पुन्हा सरशी! हॉकी फायनलमध्ये भारताचा ७-० ने दारूण पराभव
CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण
Breaking: भारताच्या ‘सेन’नं गाठलं ‘लक्ष्य’! अंतिम सामन्यात विजय मिळवत घेतलंय सुवर्णपदक