भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या धावा करण्यासाठी झगडताना दिसतो. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात रिषभ पंत संघासोबत होता. तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत भारतासाठी खेळला, पण त्याला अपेक्षित धावा मात्र करता आल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समालोचक हर्ष भोगले त्याला काही प्रश्न विचारत होते, पण पंतला त्यांचे प्रश्न पटले नाहीत, असेच काहीसे चित्र चाहत्यांना पाहायला मिळाले.
भारतीय संघाचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवान एकदिवसीय आणि टी-20 प्रकारात वादळी खेळी करत असायचा. पण कसोटी सामन्यांमध्ये मात्र त्याला असे प्रदर्शन करता येत नव्हते. हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांच्या मते रिषभ पंत (Rishabh Pant) देखील सेहवागच्या पावलावर पाऊल टाकत आहे. रिषभ पंत भारतीय कसोटी संघासाठी यापूर्वी अनेकदा मॅच विनर ठरला आहे. पण त्याची टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहता खूपच साधारन दिसते.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी हर्षा भोगले मैदानात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतला एक प्रश्न विचारला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचे साधारन प्रदर्शन लक्षात घेता त्यांनी हा प्रश्न विचारला होता. पण उत्तर देताना पंत काहीसा नाराज दिसला. भोगलेंचा हा प्रश्नच त्याला मान्य नसल्यासारखे दिसून आले. भोगले म्हणाले की, “मी विरूला (विरेंद्र सेहवाग) हा प्रश्न विचारला होता, आता तुला विचारत आहे. तुला पाहुन असे वाटते की, मर्यादित षटकांचे क्रिकेट तुझी खासीयत असेल, पण तुझी कसोटीमधील आकडेवारी सर्वात चांगली आहे.”
भोगलेंचे हे एक वाक्य पंतला चांगले लागले, असे दिसते. उत्तर देताना पंत म्हणाला की, “सर, आकडेवारी तर सर्वात्तम आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेमध्येही माझी आकडेवारी खराब नाहीये. ठीक आहे टी-20 चा…” पंतने प्रश्नाचा चुकीचा अर्थ घेतल्याचे भोगलेंना समजले आणि त्यांना त्याला थांबवले देखील. ते म्हणाले, “मी खराब म्हणत नाहीये, तुलना करत आहे.”
“तुलाना करणे आपल्या आयुष्याचा भागच नाहीये. मी आता 24-25 वर्षांचा आहे. तुलना करायची असेल, तर जेव्हा मी 30-32 वर्षांचा होईल तेव्हा करा. त्याआधी तुलना करण्याला माझ्यासाठी अर्थच नाही,” असे पंत पुढे बोलताना म्हणाला.
Rishabh Pant interview with Harsha Bhogle before 3rd ODI against NZ talking about rain, batting position, stats and scrutiny over T20i performance & WK drills. #NZvINDonPrime pic.twitter.com/TjOUdnPTCz
— S H I V A M (@shivammalik_) November 30, 2022
दरम्यान, रिषभ पंतने भारतासाठी आतापर्यंत आतापर्यंत 31 कसोटी सामने केळला आहे. यामध्या त्याने 43.32 च्या सरासरीने 2123 धावा केल्या आहेत. पंतने गाबा कसोटी सामन्यात संघासाठी वादळी फलंदाजी करत मॅच विनरची भूमिका साकारली होती आणि भारतीय संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकला होता. पंतच्या एकदिवसीय आणि टी-20 आकडेवारीचा विचार केला, तर त्याने या फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 30 आणि 66 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याची सरासरीने 34 आणि 22 अशी राहिली आहे. (‘Compare when I am 30-32’, Rishabh Pant’s reply to Harsha Bhogle)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला ‘ही’ गोष्ट जमली नाही! मालिका गमावल्यानंतर कर्णधार धवनने केले मान्य
रिषभ पंतला का दिली जात आहे जास्त संधी? वीवीएस लक्ष्मणने केला खुलासा