---Advertisement---

टेस्ट चॅम्पियनशीप फायनल: पुजारा की टेलर कोण आहे सरस? पाहा ‘ही’ आकडेवारी

On: सोमवार, मे 24, 2021 9:51 PM
---Advertisement---

प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत भारत व न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. संपूर्ण स्पर्धेत भारताचा चेतेश्वर पुजारा, ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन, न्यूझीलंडचा रॉस टेलर व इंग्लंडचा जो रूट या ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ फलंदाजांवर सर्वांची नजर होती. यातील पुजारा व टेलर हे या अंतिम सामन्यात खेळताना दिसतील. आता, या दोन दिग्गज फलंदाजांपैकी वरचढ कोण आहे? याचा हा आढावा.

सध्या जगातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे टेलर
न्यूझीलंडचा रॉस टेलर हा सध्या जगातील सर्वात अनुभवी फलंदाज मानला जातो. २००७ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या टेलरने आतापर्यंत १०५ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४५.८३ च्या सरासरीने ७३७९ धावा बनविल्या आहेत. यात १९ शतके व ३४ अर्धशतके समाविष्ट आहेत. यात २९० धावांची सर्वाच्च खेळी सामील आहे.

द्रविडचा वारसदार मानला जातो पुजारा
‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड निवृत्त झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने भारतीय संघाची धुरा सांभाळली. तिसऱ्या क्रमांकावर नेहमी जबाबदारीने खेळात त्याने भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. पुजाराने आतापर्यंत भारतीय संघासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये ४६.५९ च्या शानदार सरासरीने ६२४४ धावा जमवल्या आहेत. पुजाराच्या नावावर १८ शतके व २९ अर्धशतके जमा आहेत.

तुलनात्मकदृष्ट्या टेलर आहे वरचढ
एकूण आकडेवारीचा विचार केल्यास पुजारा व टेलर यांच्या दरम्यान टेलर काकणभर सरस वाटतो. अनुभवाचा विचार केल्यास रॉस टेलरने पुजारापेक्षा २० कसोटी अधिक खेळल्या आहेत. सरासरीच्या बाबतीत पुजारा पुढे असला तरी, शतकांच्या बाबतीत टेलर पुढे आहे. एकूणच काट्याची लढत असल्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांना आपापल्या या वरिष्ठ खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी संपूर्ण संघाला उत्तेजन देतो; त्याचे वक्तव्य चूकीच्या अर्थाने घेतले गेले, चेन्नईच्या युवा खेळाडूचे भाष्य

बुमराहचे चाहते थेट आयर्लंडमध्ये देखील! ‘ही’ महिला क्रिकेटपटू मानते आदर्श

भारताचा ‘हा’ वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज; आयपीएल संघाने केले ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---