---Advertisement---

 रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री

---Advertisement---

भारतीय फुटबॉल संघाने 10 जूनला केनियाला हरवून इंटरकॉन्टिनेंटल कप आपल्या नावे केला. याबरोबरच कर्णधार सुनिल छेत्री आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यामध्ये अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सी सोबत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

छेत्रीची ही अप्रतिम कामगिरी बघता त्याची तुलना क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी बरोबर होत आहे.

“मी रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांचाही चाहता आहे. पण त्याच्यांबरोबर तुलना करणे हे योग्य नाही”,असे त्याने म्हटले.

“मी सध्या स्वप्नात जगत आहे. आता संघाची कामगिरी चांगली असून आम्हांला अजून वरचढ संघाविरुद्ध खेळायचे आहे. तसेच कसलीही दुखापत होऊ न देता तंदूरूस्त रहायचे आहे”, असेही छेत्री म्हणाला.

छेत्रीने केला मोठा पराक्रम-

पोर्तुगालचा क्रिस्तियानो रोनाल्डो याने 150 सामन्यात 81 गोल केले असून तो  आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यामध्ये पहिल्या स्थानावर आहे.  मेस्सीने 64 गोल करताना 124 सामने खेळले आहे तर छेत्रीने 101व्या सामन्यातच 64 गोल केले आहेत.

मुंबईत झालेल्या स्पर्धेला आधीच्या सामन्यात प्रेक्षकांची खूपच कमी उपस्थिती होती. यामुळे छेत्रीने चाहत्यांना सामने भारताचे पहाण्याची विंनती त्याच्या सोशल मिडीयावरून केली होती.

त्याच्या या संदेशामुळे प्रेक्षकांची उपस्थिती वाढली. म्हणून त्यांचे आभार छेत्रीने मानले. तसेच चाहत्यांबद्दल बोलताना छेत्रीने सांगितले की,”जर अशाच प्रकारे तुमचा पाठिंबा आम्हाला असला तर आम्ही सामने जिंकण्याचा अाणखी प्रयत्न करू.”

हा अंतिम सामना भारताने 2-0 अशा फरकाने जिंकला. हे दोन्ही गोल एकट्या सुनिल छेत्रीने केल्याने त्याचे आता एकूण 64 आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत.

छेत्री सप्टेंबर 2018 मध्ये आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होत अाहे.

महत्वाच्या बातम्या:

भारताचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीला पडतोय भारी!

फुटबॉल फॉर्मेशन म्हणजे नक्की काय रे भाऊ?

मेस्सीच्या कोलकात्यामधील चाहत्याने घरालाच दिला अर्जेंटीनाच्या जर्सीचा रंग

नदालचा असाही एक पराक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही

इंटरकॉन्टिनेंटल कप 2018: सुनील छेत्रीच्या टीम इंडियाने केनियाचा पराभव करत जिंकले विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment