इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. सोमवारी (३ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला होता. आता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आज (४ मे) होणाऱ्या सामन्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा टप्पा अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये सुरू आहे. अशातच बायो बबलमध्ये असूनही आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळेच दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये दिल्लीमध्ये होणारे सामने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांच्या समक्ष याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध केली गेली आहे.
यावर न्यायमूर्ती म्हणाल्या आहेत की, “वकील एस ठूकराल यांनी ही याचिका दाखलल केली असून ही एक जनहित याचिका आहे. शहरात अनेक रुग्णालय आहेत, जिथे बेड, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे नाहीये”.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, “लोक आपल्या प्रियजनांना अंत्यसंस्कार करताना दिल्लीत आयपीएल सामने खेळणे उचित आहे का? दिल्लीत अशी परिस्थिती असताना, दिल्लीतील स्टेडियम लोकांना कोविड सेंटर म्हणून देण्यात यावे असे याचिकेत म्हटले गेले आहे.” या स्टेडियमवर मागील सामना २८ एप्रिल रोजी खेळवण्यात आला होता, तर अंतिम सामना ८ मे रोजी होणार आहे.
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर अरुण जेटली स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफमधील ५ कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत भीतीचे वातावरण आहे. आज होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघातील सामना देखील दिल्लीच्या स्टेडियमवर आहे. त्यामुळे हा सामना खेळू दिला जाईल का? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खरा संघमालक! केकेआरच्या ताफ्यात कोरोनाची एंट्री, खुद्द किंग खानने खेळाडूंना ‘असा’ दिला धीर
पृथ्वी शॉच्या अवघड जागी लागला चेंडू, मग फलंदाजाने भर मैदानातचं केलं असं काही; पाहून व्हाल लोटपोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल होणार स्थगित? बीसीसीआय अधिकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर






