आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तसेच एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाड हा सीएसकेचा नवीन कर्णधार असणार आहे.
याबरोबरच आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत 6 मराठमोळ्या खेळाडूंनी कर्णधारपद भूषवले आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव,झहीर खान, श्रेयस अय्यर अशा मराठमोळ्या कर्णधारांनी कर्णधारपद भूबषवले आहे. यामध्ये एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच तो देखील एक मराठमोळा खेळाडू आहे.
यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने मुंबई इंडियन्ससाठी 51 सामन्यात कर्णधारपद भूषवले असून मुंबई इंडियन्सने 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 21 सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर झहीर खानने आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व 2016-17 साली भूषवले होते. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स झहीर खान नेतृत्वात 23 सामने खेळले असून 10 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला होता. तसेच 13 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला होता.
तसेच रोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व 2013-23 साली भूषवले होते. यामध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात 158 सामने खेळले असून 87 सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला होता. तसेच 67 सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर अजिंक्य रहाणेने आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि पुणे सुपर जायट्सचे नेतृत्व 2017-19 साली भूषवले होते. यामध्ये राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात 25 सामने खेळले असून 9 सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय झाला होता. तसेच 16 सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना करावा लागला होता.
याबरोबरच सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या इतिहासात 2023 साली एकाच सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. यामध्ये मुंबई इंडियन्सचा विजय झाला होता. तसेच श्रेयस अय्यरने आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि सध्या केकेआरचे नेतृत्व 2018-22 साली करत आहे. यामध्ये केकेआरने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 55 सामने खेळले असून 27 सामन्यात केकेआरचा विजय झाला होता. तसेच 26 सामन्यात केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या इतिहासात पहिल्यादांच कर्णधार बनला आहे. कारण एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- BREAKING । थालाच्या चाहत्यांचं हर्टब्रेक! ऋतुराज बनला सीएसकेचा नवा कर्णधार
- काय सांगता! सरफराज खानच्या वडिलांसोबतही क्रिकेट खेळला आहे हिटमॅन!