---Advertisement---

इंग्लंडसाठी समीकरण गुंतागुंतीचे, स्कॉटलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यावर नजर, पाऊस पडला तर पाकिस्तानसारखी परिस्थिती

---Advertisement---

सलग तीन विजयांसह सुपर-8 मध्ये स्थान मिळविणारा ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत स्कॉटलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोणतीही शिथिलता दाखवणार नाही. ब गटात ऑस्ट्रेलियाने आधीच सुपर-8 मध्ये पहिले स्थान मिळवले आहे, मात्र या गटात दुसरे स्थान मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या स्कॉटलंड आणि इंग्लंडसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यास किंवा हा सामना पावसामुळे वाहून गेल्यास स्कॉटलंड सुपर-8 मध्ये पोहोचेल, पण जर त्यांनी हा सामना गमावला आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला पराभूत केले तर ते बाहेर पडतील. तर इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला तरी स्कॉटलंड सुपर-8 मध्ये पोहोचेल. अशा स्थितीत इंग्लंड विश्वचषकातून बाहेर पडेल.

स्कॉटलंडकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची ही मोठी संधी आहे आणि त्यांचे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात कोणतीही चूक करणार नाहीत. यासोबतच स्कॉटिश संघही पावसासाठी प्रार्थना करणार आहे. स्कॉटलंडचे सध्या पाच गुण आहेत, पण इंग्लंडचा नेट रनरेट त्यापेक्षा चांगला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना पावसामुळे वाहून गेला तर स्कॉटलंड सुपर-8 मध्ये पोहोचेल आणि इंग्लंड संघाची अवस्था पाकिस्तानसारखी होईल.

ऑस्ट्रेलियन संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्यांना चिंतेचे कारण नाही. नॅथन एलिसला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, कारण ऑस्ट्रेलिया सुपर 8 च्या खडतर आव्हानापुढे पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या तीन प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देऊ शकते.

महत्तवाच्या बातम्या-

कोण आहे इरफान पठाणची पत्नी सफा बेग? वयाच्या 21 व्या वर्षीच केले होते लग्न
धक्कादायक! माझी सर्व कमाई दान करणार; टी20 विश्वचषकादरम्यान रिषभ पंतने दिले वचन
मोठी बातमी! न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असेल, स्वत: केली घोषणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---