वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही मस्ती करताना दिसतो. त्याचा एक गमतीशीर व्हिडिओ नुकताच भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने पोस्ट केला आहे. यामध्ये गेल एक हिंदी डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करत आहे.
या व्हिडिओमध्ये गेल ‘कॉन्फिडन्स मेरा, कब्र बनेगी तेरी’ हा डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो हा डायलॉग पूर्ण करु शकला नाही. या व्हिडिओमध्ये गेलच्या मागे युवराजही उभा आहे. यावेळी जेव्हा गेलला हिंदी डायलॉग पूर्ण करता आला नाही तेव्हा युवराजला त्याचे हसू रोखता आले नसल्याचेही दिसते.
युवराजने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ”कॉन्फिडन्स मेरा, कब्र बनेगी तेरी’, खूप मस्त काका’.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1239111700659318786
गेल आणि युवराज २०१८ च्या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून एकत्र खेळले आहेत. पण २०१९मध्ये युवराज मुंबईकडून खेळला. त्यानंतर युवराजने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असल्याने तो २०२०मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसून येणार नाही. गेल मात्र २०१८ पासून पंजाबकडून आयपीएल खेळत आहे.
युवराज नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजमध्ये इंडियन लिजंड्सकडून खेळताना दिसला होता. या स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने इंडियन लिजंड्सने जिंकले होतेे. पण ही स्पर्धा कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता पुढे ढकलण्यात आली आहे.
याबरोबरच यावर्षीच्या आयपीएलच्या १३ व्या मोसमालाही १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
–“तूला आता आमचा ब्रोमान्स झेलावा लागेल”
– अखेर कॅप्टन कूल एमएस धोनीने चेन्नई सोडलीच
– यावेळी आयपीएलचे असे काही आयोजन होणार की प्रेक्षकही होतील…