वनडे विश्वचषकाच्या समाप्तीनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. 23 नोव्हेंबर पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल. या संघात जवळपास सर्वच युवा खेळाडू आहेत. या मालिकेसाठी अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल व यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांना संधी मिळालेली नाही. त्यावर आता राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या मालिकेसाठी संजू सॅमसन व शहर यांना भारतीय संघात स्थान मिळेल अशी सर्वांना आशा होती. मात्र, अखेरीस त्यांचे संघात नाव आले नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना थरूर यांनी ट्विट करत म्हटले,
This is truly inexplicable. @IamSanjuSamson should have not just been selected, he should have led the side in the absence of all the seniors. His captaincy experience with Kerala and @rajasthanroyals is more current than SKY's. Our selectors need to explain themselves to the… https://t.co/W251o89jzs
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 21, 2023
’हे खरोखर अनाकलनीय आहे. संजूची केवळ निवडच नव्हती व्हायला हवी तर, सर्व वरिष्ठांच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व करायला हवे होते. केरळ आणि राजस्थान रॉयल्स सोबतचा त्याचा कर्णधारपदाचा अनुभव सूर्यकुमारच्या तुलनेत अधिक आहे. आमच्या निवडकर्त्यांनी क्रिकेटप्रेमी जनतेला याबाबत उत्तर देण्याची गरज आहे. आणि चहल का संघात नाही?
यापूर्वी देखील संजूला डावलल्यामुळे अनेक वेळा थरूर यांनी यांनी निवड समितीवर हल्लाबोल चढवला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार
(Congress Leader Shashi Tharoor Slams BCCI For Not Picking Sanju Samson And Chahal)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: लखनऊला बाय-बाय करत गंभीर पुन्हा केकेआरच्या ताफ्यात, आगामी IPL साठी बनला मेंटर
“एक लाख 30 हजार लोक शांत झाले आणि…” लॅब्युशेनने सांगितला Final मधील ‘तो’ क्षण