---Advertisement---

IPL 2026: पदार्पणातच पंजाबला थरारक विजय मिळवून देणारा कूपर कॉनली कोण आहे? जाणून घ्या…

On: बुधवार, एप्रिल 1, 2026 6:28 AM
---Advertisement---

२२ वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कूपर कॉनलीने, आयपीएल २०२६ मधील आपल्या प्रभावी पदार्पामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाब किंग्स संघाकडून खेळताना, त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून रोमांचक विजय मिळवला.

गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पंजाबने सुरुवातीलाच एक गडी गमावला. त्यानंतर, कर्णधार श्रेयस अय्यरने कूपर कॉनलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. या संधीचा पुरेपूर फायदा घेत, कॉनलीने एक शानदार अर्धशतक झळकावले. ४४ चेंडूंमध्ये नाबाद ७२ धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये कॉनलीने ५ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सामन्याच्या अगदी शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरून राहिला. २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून त्याने आपल्या संघाचा विजय मिळवून दिला.

या उत्कृष्ट खेळीसाठी त्याला सामनावीर (Player of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयपीएल २०२६ च्या लिलावात पंजाब किंग्सने त्याला ३ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने आपण मोजलेल्या प्रत्येक पैशाचे मोल सार्थ ठरवले.

कूपर कॉनली हा एक आक्रमक फलंदाज आहे, जो आपल्या गोलंदाजीनेही संघासाठी योगदान देतो. त्याच्या खेळण्याच्या शैलीची तुलना ग्लेन मॅक्सवेलशी केली जात आहे. शिवाय, तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शॉन मार्श याला आपला आदर्श मानतो. आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, त्याने ५२ टी-२० सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने ८७० धावा तर ३० विकेट घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कॉनलीने आपली छाप पाडली आहे, त्याने ऑस्ट्रेलियासाठी १ कसोटी, ८ एकदिवसीय (ODI) आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ७ सप्टेंबर २०२४ रोजी स्कॉटलंडविरुद्ध त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर २०२५ मध्ये स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली त्याने श्रीलंकेविरुद्ध आपला एकमेव कसोटी सामना खेळला. एकदिवसीय सामन्यांमध्ये, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच सामन्यात ५ विकेट विशेष कामगिरी नोंदवली. या प्रभावी पदार्पणाच्या पार्श्वभूमीवर, भविष्यात आयपीएलमध्ये कूपर कॉनली एक प्रमुख मॅचविनर म्हणून उदयास येईल, अशी मोठी अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---