---Advertisement---

ISL 2018: जमशेदपूरमधील सामन्यात एटीकेची लागणार कसोटी

On: रविवार, ऑक्टोबर 21, 2018 7:30 AM
---Advertisement---

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (21 ऑक्टोबर) अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) विरुद्ध जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात होणार आहे.

गेल्या मोसमात स्टीव कॉपेल यांनी जमशेदपूरला मार्गदर्शन केले होते. आता ते एटीकेकडे वळले आहेत. त्यांची या लढतीत कसोटी लागेल. दुसरीकडे खाते उघडल्यामुळे ताजेतवाना झालेल्या एटीकेसमोर जमशेदपूरला घरच्या मैदानावर प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.

गेल्या मोसमात कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरचे बाद फेरीतील स्थान थोडक्यात हुकले, पण घरच्या मैदानावर त्यांना नऊ पैकी तीनच सामने जिंकता आले होते.

कॉपेल यांनी सांगितले की, “जमशेदपूरमध्ये परतल्यामुळे मला छान वाटत आहे. गेल्या वर्षी आम्ही बाद फेरी गाठू शकलो नाही तरी जी कामगिरी केली त्याचा अभिमान वाटतो. नव्या फ्रँचायजीसाठी ही मोठी कामगिरी होती. या लढतीसाठी मी उत्सूक आहे.”

जमशेदपूरची सुत्रे यंदा सीझार फर्नांडो यांच्याकडे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दोन सामन्यांत संघाने प्रभावी खेळ केला आहे, पण हे दोन्ही सामने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर (अवे) झाले. जमशेदूपरने आधी मुंबई सिटी एफसीला 2-0 असे हरविले. त्यानंतर संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले.

फर्नांडो म्हणाले की, “एटीके हा चांगला संघ आहे. पहिल्या सामन्याच्या तुलनेत त्यांनी कामगिरी सुधारली आहे. त्यांच्याकडे चांगले प्रशिक्षक आहेत. एटीकेविरुद्धचा सामना माझ्यादृष्टिने मोसमातील सर्वांत महत्त्वाचा आहे. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. आम्हाला सांघिक खेळ करण्याची गरज असेल. आम्ही जिंकू शकू याची खात्री वाटते.”

कॉपेल गतमोसमात येथे होते तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी बजावली. त्यांना बरेच खेळाडू माहित आहेत. त्यांच्यासमोर आम्ही चांगला खेळ करू अशी आशा असल्याचेही फर्नांडो यांनी सांगितले.

जमशेदपूरने करारबद्ध केलेले नवे खेळाडू आतापर्यंत चमकले आहेत. मारीओ आर्क्वेस हा नवा खेळाडू मोसमाचे वैशिष्ट्य ठरण्याची अपेक्षा आताच निर्माण झाली आहे, तर मेमो याच्यासारख्या परिचीत खेळाडूने मध्य क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे. सर्जिओ सिदोंचा आणि पाब्लो मोर्गाडो यांनीही मैदानावर ठसा उमटविला आहे.

मुख्य म्हणजे यंदा सर्वाधिक गोल केलेल्या खेळाडूंचा मान जमशेदपूरकडे आहे. त्यांच्या चार जणांनी गोल केले आहेत. सर्वाधिक चार जणांनी पदार्पण करण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे.

कॉपेल यांच्यासाठी मोसमाची सुरवात अवघड ठरली. पूर्वी त्यांच्या संघांच्या बाबतीत असेच घडले आहे. पहिले दोन सामने एटीकेने गमावले. त्यानंतर मात्र दिल्ली डायनॅमोजला 2-1 असे हरवून या संघाने पुरागमन केले.

कॉपेल यांचे संघ साधारणपणे भक्कम बचाव करतात, पण आतापर्यंत तीन सामन्यांत जॉन जॉन्सन व गेर्सन व्हिएरा यांना ठसा उमटविता आलेला नाही. दिल्लीवरील विजयामुळे त्यांच्या आघाडी फळीचा आत्मविश्वास मात्र उंचावला आहे.

बलवंत सिंग आणि अल मैमौनी नौसैर यांनी मागील सामन्यात गोल केले. मॅन्यूएल लँझरॉत याला सर्वोत्तम फॉर्म गवसण्याची चिन्हे आहेत. चाली रचण्यात कालू उचे यानेही योगदान दिले आहे.

कॉपेल यांनी सांगितले की, जमशेदपूरचे दोन सामने झाले असले तरी त्यांची सुरवात भक्कम झाली आहे. आम्ही सुद्धा आक्रमक करण्याचा प्रयत्न करू. आमच्यासाठी हे मोठे आव्हान आहे. आम्ही गुण जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू.

टीम कॅहील याची आघाडी फळीतील उपस्थिती आणि जॉन्सनसारख्या अनुभवी खेळाडूविरुद्ध त्याची झुंज उत्कंठावर्धक ठरेल. यात सिदोंचा याचाही समावेश असल्यामुळे एटीच्या बचाव फळीसमोर कडवे आव्हान असेल.

आपला संघ म्हणजे सर्वस्वी बचावात्मक फुटबॉल नसल्याचे एटीकेने दाखवून दिले आहे. त्यांच्याकडे दोन्ही बाजूंनी वेगवान प्रतिआक्रमण रचण्याची क्षमता आहे. अशावेळी फर्नांडो यांच्या संघाला भेदक खेळाला सामोरे जावे लागेल. फर्नांडो यांचा संघ घरच्या मैदानावर पकड राखण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: दिल्लीच्या विजयाची प्रतिक्षा कायम; केरला विरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत

नेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम

ISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा

सई ताम्हणकरचा झी महाराष्ट्र कुस्ती दंगल मधील संघ कोल्हापुरी मावळे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment