न्यूझीलंडचा २९ वर्षीय फलंदाज कोरे अँडरसनने न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त शनिवारी समोर आले आहे. अमेरिकेतील आगामी मेजर लीग टी२० क्रिकेट खेळण्यासाठी तीन वर्षांचा करार केल्यानंतर अँडरसनने तातडीने न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम अँडरसनच्या नावावर आहे. त्याला त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. त्याने न्यूझीलंडकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ९३ सामने खेळले आहेत. यात त्याने २ शतके आणि १० अर्धशतकांसह २००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
अँडरसनची प्रेयसी आहे अमेरिकन
अँडरसनची प्रेयसी अमेरिकन आहे. तिचे नाव मेरी शामबर्गर आहे. तसेच सध्या त्याने लॉक़डाऊनमधील त्याचा बराचसा वेळ अमेरिकेतच घालवला आहे.
न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणे सन्मानजनक –
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अँडरसन म्हणाला, ‘न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणे हा खूप मोठा सन्मान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला न्यूधीलंडकडून अधिक गोष्टी साध्य करणे आणि खेळणे आवडले असते, परंतु कधीकधी असेच होते आणि वेगवेगळ्या संधी उद्भवतात आणि तुम्हाला अशा दिशेने पाठवतात ज्याचा आपण कधीही विचार केला नसेल. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल खूप मी कृतज्ञ आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् अशी सुरु झाली शिखर धवनची लव्हस्टोरी
ट्रेंडिंग लेख –
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी