भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारताच्या प्लेयिंग एलेव्हेनमध्ये फिरकीपटू यूझवेंद्र चहलचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून त्याला सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली. त्यानेही संधीचं सोनं केलं आणि भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगीरी बजावली.
सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कन्कशन पर्यायाबद्दल मोठे भाष्य केले.
मिशेल स्टार्कच्या चेंडूंमुळे झाली दुखापत
अष्टपैलू रवींद्र जडेजाने 23 चेंडूत 44 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र या खेळीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा सामना करताना शेवटच्या षटकात त्याच्या डोक्याला चेंडू लागला. त्यामुळे प्रकृती बरी नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात तो मैदानात उतरू शकला नाही.
युझवेंद्र चहलने केली उत्कृष्ट कामगीरी
कन्कशन सब्स्टिट्यूट युझवेंद्र चहलने 25 धावांत 3 महत्वाचे बळी घेत ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. त्याच्या उत्कृष्ट कामगीरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौवरवण्यात आले.
कन्कशन पर्याय विचित्र – विराट कोहली
सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, “सामन्यात युजीला (चहल) खेळवण्याची कोणतीही योजना नव्हती. जडेजाच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे त्याला चक्कर येत होती. कन्कशन पर्याय ही एक विचित्र गोष्ट आहे, आज ती आमच्यासाठी उपयुक्त ठरली. पण कदाचित पुढच्या वेळी असे होणार नाही.”
चहलने दाखवले धैर्य
चहलचे कौतुक करताना कोहली म्हणाला, “चहलने खरोखर चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टीचीही त्याला साथ मिळाली. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात त्याने मोठे धैर्य दाखवले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या चुकांमुळे आम्हाला काही गडी बाद करता आले. हेच टी20 क्रिकेट आहे.”
हार्दिकने घेतलेल्या झेलमुळे पालटले सामन्याचे चित्र
“ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुम्हाला सामन्याच्या अखेरपर्यंत वर्चस्व राखावे लागते. मागील वनडे सामन्यातही जडेजाने चांगली फलंदाजी केली. नटराजनही कामगिरीत सुधार करू शकतो. दीपक चाहरनेही चांगली गोलंदाजी केली. चहलच्या गोलंदाजीमुळे सामना आमच्या बाजूने वळला. हार्दिकचा झेलनेही सामन्याचे चित्र पालटले,”असेही पुढे बोलताना कोहली म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् अशी सुरु झाली शिखर धवनची लव्हस्टोरी
“जर नटराजनने बुमराहसारखीच कामगीरी केली, तर…”, सेहवागने दोघांबद्दल सांगितला अजब योगायोग
ट्रेंडिंग लेख –
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण
HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी