कोरोना काळात आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी भारतीय संघ बुधवारी (11 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया दौर्यावर रवाना झाला होता. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 वनडे, 3 टी20 नंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रवाना होण्यापूर्वी सर्व भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी झाली.
या चाचणीचा अहवाल आला असून सर्व भारतीय खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने सिडनी येथे सरावास सुरुवात केली आहे. असे असले तरी त्यांना 14 दिवस क्वारंटाईनचे नियम पाळावे लागणार आहेत. 27 नोव्हेंबरला सिडनी येथे होणाऱ्या वनडे सामन्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यास सुरुवात करेल.
भारतीय संघाचे सराव करतानाचे फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केले आहेत. यात खेळाडू मैदानावर सराव करण्याबरोबरच जीममध्येही घाम गाळताना दिसत आहेत.
Two days off the plane and #TeamIndia had their first outdoor session today. A bit of 🏃 to get the body moving! #AUSIND pic.twitter.com/GQkvCU6m15
— BCCI (@BCCI) November 14, 2020
Once out, the boys also hit the gym!💪 pic.twitter.com/X3QL3uHQJy
— BCCI (@BCCI) November 14, 2020
Here's the plank challenge ft @mayankcricket @RealShubmanGill @im_manishpandey! What's your personal best? #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/ht2azzZmjC
— BCCI (@BCCI) November 15, 2020
रोहित शर्मा मात्र ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघा बरोबर गेलेला नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. त्यानंतर रोहित ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेसाठी रवाना होईल. त्याला मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. पण कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताचा कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार),रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्म्द शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्म्द सिराज
टी-20 संघ: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल (उप-कर्णधार, यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडेय, हार्दिक पंड्या, संजू सैमसन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन
वनडे टीम: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल (उप-कर्णधार, यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, संजू सैमसन (यष्टीरक्षक) ,रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी शार्दूल ठाकुर
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
विराट कोहलीच्या टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ युवा गोलंदाज सज्ज
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर