भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. यावेळी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात युवा फिरकीपटू मिशेल स्वीप्सन याचीही निवड झाली आहे. त्यामुळे त्याला कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. याबद्दल त्याने त्याच्या भावना क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या डिजिटल मीडिया प्रोडक्शनच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवल्या.
विराटने सर्वोत्कृष्ट संघाला नेहमीच दिले आव्हान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. कोहलीविरुद्ध गोलंदाजी करण्याबद्दल विचारले असता स्वीप्सन म्हणाला की, “विराटने सर्वोत्कृष्ट संघाला नेहमीच आव्हान दिले आहे.”
विराटच्या सर्वोत्कृष्ट भारतीय संघाला द्यायचे आहे आव्हान
“तुम्हाला विराटच्या सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध आव्हान द्यायचे आहे. माझ्यासाठी हे एक वेगळ आव्हान आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मी एका महान क्रिकेटपटूविरूद्ध स्वत: ची चाचणी घेण्यास उत्साही आहे,” असे स्वीप्सन म्हणाला.
भारतीय संघाची फलंदाजी जागतिक दर्जाची -स्वीप्सन
भारतीय संघाबद्दल बोलताना स्वीपसन म्हणाला की, “भारतीय संघाची संपूर्ण फलंदाजी जागतिक दर्जाची आहे. त्यांच्याविरुद्ध गोलंदाजी करणे म्हणजे माझी कसोटी असेल. या आव्हानाची मी वाट पाहत आहे.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वीपसनने घेतले 23 बळी
स्वीप्सन गेल्या काही काळापासून राष्ट्रीय संघाचे दार ठोठावत होता. बांगलादेश दौर्यासाठी त्यांची निवड झाली होती. पण कोविड 19 या साथीच्या आजारामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्याने या हंगामात शेफील्ड शील्ड या देशांतर्गत स्पर्धेत 21.17 च्या सरासरीने 23 बळी घेतले.
नेथन लायन असेल पहिली पसंत
स्वीप्सन याने कबूल केले की प्लेयिंग इलेव्हनसाठी वरिष्ठ फिरकीपटू नेथन लायन हा पहिली पसंत असेल. जर संघात दोन फिरकीपटूंना स्थान दिले, तर मी तयार असेल असेही त्याने सांगितले.
भविष्यात संधी मिळण्याची खात्री
मिळालेल्या संधीबद्दल बोलताना स्वीप्सन म्हणाला की, “सर्व चार कसोटी सामने खेळण्याच्या उद्देशाने मी तयारी करेन. संधी मिळाली, तर त्याचा दोन्ही हातांनी स्वीकार करेल. जर संधी मिळाली नाही, तर भविष्यात ती मिळण्याची अधिक शक्यता आहे, याची मला खात्री आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! मेगा लिलाव झाला, तर हैदराबाद करणार ‘या’ दमदार खेळाडूला रिटेन; वॉर्नरचे संकेत
भन्नाटच! WBBL मधील ‘हा’ एकहाती झेल पाहुन तुम्हीही व्हाल थक्क
…म्हणून युवराज सिंगने दिला होता मास्टर ब्लास्टर सचिन सोबत बसायला नकार
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर






