युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याला भारतीय क्रिकेट संघातील सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांशी खेळण्याची संधी मिळाली. युवराजने 2000 मध्ये आयसीसी नॉकआउट ट्रॉफीमध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते. नुकत्याच झालेल्या एका शो दरम्यान युवराज सिंगने या दिग्गजांसोबत खेळण्याचा आणि ड्रेसिंग रूम मधील अनुभव कसा होता हे सांगितले आहे. युवराज जेव्हा प्रथमच सचिन तेंडुलकरला भेटला तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी होती हे माजी भारतीय अष्टपैलू खेळाडूने सांगितले.
मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखालील 19 वर्षांखालील विश्वाचषक 2000 च्या विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या युवराज सिंगला अचानक आपल्या आदर्श क्रिकेटपटूंबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करण्याचे भाग्य प्राप्त झाले. युवराज सिंगने भारतीय क्रिकेट संघात त्याचे सुरुवातीचे दिवस कसे होते आणि सचिन तेंडुलकरसमवेत रिकाम्या जागेवर बसण्यास नकार कसा दिला, हे सांगितले.
युवराज सिंगने एका कार्यक्रमात सांगितले, “माझ्या लहानपणीच्या हीरोला प्रथमच भेटणे म्हणजे काय होते हे मी सांगू शकत नाही. कॅम्प सुरू होण्यापूर्वी मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो.” सचिनने त्याच्याशी , झहीर खान आणि विजय दहिया यांच्याशी कशी हातमिळवणी केली हेही युवराजने सांगितले. युवीने सांगितले की सचिनबरोबर हात मिळवल्यानंतर मी तो हात माझ्या अंगावर चोळला. मी सचिनबरोबर हातमिळवणी केल्यामुळे मला आंघोळ करण्याची इच्छा नव्हती.
युवराज म्हणाला, ‘टीम बसमध्ये माझ्यासाठी फक्त एकच जागा होती, जी सचिनच्या बाजूला होती. मी मॅनेजरला सांगितले की या सीटवर मी बसू शकतो असे मला वाटत नाही. तर त्याने मला सांगितले की नाही … आता तो तुमचा सहकारी आहे. तुला त्याच्याशी बोलावे लागेल. यानंतर मी हळू हळू तिथे गेलो. मी त्याला वरुन खाली पाहिले आणि मला पटले की तो खरोखरच आहे. ”
युवराजसिंग म्हणाला की, ‘मी माझी किट बॅग उघडली आणि त्यात सचिनचा एक फोटो होता. तो फोटो पाहून सचिन म्हणाला – छान फोटो! हा फलंदाज कोण आहे? यानंतर तो हसू लागला. मला वाटते की आमचे संभाषण इथूनच सुरू झाले आणि त्यानी मला थोड सामन्य करण्याचा प्रयत्न केला.’
महत्त्वाच्या बातम्या –
VIDEO : आयपीएल गाजवणाऱ्या सूर्यकुमारचे मुंबईत जोरदार स्वागत, फोटो काढण्यासाठी शेजारी उत्सुक
‘हा’ क्रिकेटपटू टीम इंडियात घेऊ शकतो एमएस धोनीची जागा
हा २ वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलिया संघ नाही, भारतासमोर मोठे आव्हान उभे करु, प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
ट्रेंडिंग लेख
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर