इंडियन प्रीमियर लीग 2020 चा किताब मुंबई इंडियन्सने जिंकला. आयपीएल कारकिर्दीतील हा या संघाचा पाचवा किताब होता. मुंबईला किताब जिंकवून देण्यात या संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने मोलाची कामगिरी बजावली. त्याने स्वतःच्या बळावर मुंबईला काही सामन्यात विजय मिळवून दिला. आयपीएलचा हंगाम संपन्न झाल्यावर तो घरी परतला, त्याचे घरी जोरदार स्वागत झाले. या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आयपीएल 2020 मध्ये सूर्यकुमारने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने 16 सामन्यात 40 च्या सरासरीने आणि 145.01 च्या स्ट्राइक रेटने 480 धावा केल्या. यात चार अर्धशतकांचा समावेश होता. त्याने मुंबई इंडियन्ससाठी अनेक अविस्मरणीय डावही खेळले आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 165 धावांचा पाठलाग करताना 72 धावांत तीन गडी गमावले होते. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने संघाची जबाबदारी स्वीकारली. त्याने 43 चेंडूंत 79 धावांचा शानदार डाव खेळला आणि संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला.
आयपीएलमधील यशानंतर सूर्यकुमार यादव मुंबईतील आपल्या घरी परतला. तिथे त्याचे जोरदार स्वागत झाले. आईने ओवाळून व कपाळाला टिळक लावून आपल्या मुलाचे स्वागत केले. त्यावेळी त्याचे शेजारीही तेथे उपस्थित होते आणि त्यांनीही त्याचे स्वागत केले. काही लहान मुलांनी बॅटवर त्याच्या ऑटोग्राफ घेतला. सूर्यकुमारसोबत फोटो काढण्यासाठी शेजारीही उत्साही होते. मुंबई इंडियन्सनेही खेळाडूंच्या कुटूंबाला युएईला जाण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे त्याची पत्नीही त्याच्याबरोबर होती.
आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सने पराभव केला आणि पाचव्यांदा जेतेपद जिंकले. आयपीएलनंतर मुंबईच्या या फलंदाजाला काही आठवड्यांची विश्रांती मिळेल. त्यानंतर 2020-21 च्या देशांतर्गत हंगामाच्या तयारीला लागेल. अशी अपेक्षा आहे की देशांतर्गत क्रिकेट हंगाम जानेवारी 2021 पासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ क्रिकेटपटू टीम इंडियात घेऊ शकतो एमएस धोनीची जागा
हा २ वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रेलिया संघ नाही, भारतासमोर मोठे आव्हान उभे करु, प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
आयपीएल २०२१ साठी केव्हा होणार लिलाव? बीसीसीआयने दिली फ्रेंचायजीना माहिती
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर






