इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) २०२२ला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जाणार आहे. मात्र, यापूर्वी आयपीएल चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर येत आहे. कारण, आता आयपीएल २०२२चे आयोजन बंद दारामागे म्हणजेच प्रेक्षकांविना केले जाऊ शकते. चला तर मग कसं ते जाणून घेऊया…
चाहत्यांना मोठा झटका
आयपीएल २०२२साठी (IPL 2022) चाहत्यांना मोठा झटका लागू शकतो. आयपीएल २०२२चे आयोजन प्रेक्षकांविना केले जाऊ शकतो. सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने आयपीएल स्पर्धेसाठी २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची परवानगी दिली होती. मात्र, आता हा आदेश परत घ्यावा लागू शकतो. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडून राज्यात नवीन कोव्हिड-१९ची चेतावणी दिली आहे, ज्याचा आयपीएलवर परिणाम झाला आहे. आयपीएल २०२२मध्ये अधिकतर सामने मुंबईच्या मैदानांवर खेळले जाणार आहेत.
केंद्र सरकारने राज्यांना जारी केला अलर्ट
महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट आयपीएलबाबत बोलणं टाळलं. मात्र, त्यांनी सांगितले की, “केंद्र सरकारकडून सावध राहण्याचे पत्र मिळाले आहे. कारण, युरोपीय देश, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीये. त्यामुळे आमच्या आरोग्य विभागाने पत्र जारी करत सावध राहण्यासाठी आणि आवश्यक पावले उचलण्यास सांगितले होते. आयपीएलबाबत आम्हाला आता काहीही बोलायचे नाही.”
मुंबईत होणार सर्वाधिक सामने
कोरोनामुळे जास्तीत जास्त सामने महाराष्ट्रात होणार आहेत. आयपीएल २०२२मध्ये एकूण ७० साखळी सामने खेळले जाणार आहे. या ७० सामन्यांपैकी ५५ सामने मुंबईच्या वानखेडे, डी. वाय. पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडिअम खेळले जाणार आहेत. याव्यतिरिक्त पुण्याच्या एमसीए स्टेडिअममध्ये १५ सामने खेळले जाणार आहेत. या आयपीएल २०२२मध्ये १० संघ वानखेडे आणि डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये प्रत्येकी ४ सामने खेळणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांना पुणे आणि ब्रेबॉर्नमध्ये प्रत्येकी ३ सामने खेळायचे आहेत.
कोरोनामुळे आयपीएलवर परिणाम
कोरोनामुळे आयपीएलवर परिणाम होत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आयपीएलचे आयोजन युएईत करावे लागले होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचे आयोजन महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची जवळपास नवीन १७१ प्रकरणं समोर आली आहेत. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आतापासूनच सावध आहे.
आता प्रेक्षकांना प्रत्यक्षात स्टेडिअममध्ये जाऊन आयपीएल सामने पाहायला मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये रैनाला मिळाली नाही संधी, पण मालदीव सरकारने दिलाय मोठा पुरस्कार
आयपीएलमधील रोमांच होणार कमी? सर्वात यशस्वी ५ गोलंदाजांपैकी हे ४ जणं स्पर्धेतून बाहेर
IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा