---Advertisement---

‘दोन गुणांची किंमत देशापेक्षा मोठी नाही..’ भारत-पाक सामन्यावर गौतम गंभीरचे रोखठोक विधान

On: मंगळवार, फेब्रुवारी 3, 2026 5:45 PM
---Advertisement---

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत – पाकिस्तान हे दोन्ही संघ १५ फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. पण पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला असला तरीदेखील भारतीय संघ श्रीलंकेत जाणार आहे.

पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकला असला तरीदेखील भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पण आयसीसीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे सर्व प्रकरण सुरू असताना भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने केलेलं जुनं विधान चर्चेत आलं आहे.पाकिस्तानकडून पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता. शेवटी भारतीय संघ हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण सूर्यकुमार यादवने हँडशेक करण्यास नकार दिला होता.

गौतम गंभीर म्हणाला होता, “पाकिस्तानसोबतचे संबंध एकतर पूर्णपणे तोडा किंवा सर्वकाही सुरळीत ठेवा, ‘सशर्त बंदी’ असं काही नसतं. पुलवामात जे घडलं ते कधीही विसरता येणार नाही. आशिया चषक स्पर्धेत तरी किमान पाकिस्तानवर बहिष्कार टाकायलाच हवा.

“तसेच तो पुढे म्हणाला होता की, “भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देणार असेल तर, कोणत्याही माध्यमांनी त्यांना दोष देऊ नये. दोन गुण इतके महत्वाचे नाहीत. देश आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. ज्या ४० सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत, ते क्रिकेट सामन्यांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. याच कारणावरून जर भारतीय संघाने अंतिम फेरी सोडली, तर देशाने त्यासाठी तयार असले पाहिजे.” भारताने आशिया चषक २०२६ स्पर्धेतील अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---