कोलकाता। कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांतील क्रिकेटचे नुकसान झाले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटचाही समावेश आहे. त्यातही बंगाल क्रिकेटला कोरोनाचा चांगलाच तडाखा बसला आहे. कोलकाताचे ईडन गार्डन मैदानच नाही, तर या मैदानात असणारे राज्य क्रिकेटचे पावर हाऊस बंगाल क्रिकेट संघाचे (CAB) मुख्यालयही कोरोनाच्या तावडीत सापडले आहे.
कॅबच्या मुख्य अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत कोरोना व्हायरसचे (Corona Virus) संक्रमण झाल्यामुळे स्टेडिअम अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसने बंगालमध्ये क्रिकेटपटू, पंच, निवडकर्ता यांनाही आपल्या संक्रमित केले आहे. फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोलकाताच्या पूर्व बंगाल, मोहन बगान आणि मोहम्मदान स्पोर्टिंग क्लब यांचीही परिस्थिती कॅबप्रमाणेच वाईट आहे.
कोरोनामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि कॅबचा अध्यक्ष अविषेक दालमिया (Avishek Dalmiya) यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. राज्य क्रिकेट संघाचे निवडकर्ता सागरमय सेनशर्मा हे मे महिन्यात कोरोना संक्रमित झाले होते. तेव्हापासून बंगाल क्रिकेटवर कोरोनाचे सावट पसरले आहे.
माजी वेगवान गोलंदाज सागरमय १९८९-९० मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या बंगाल संघाचे सदस्य आहेत. ५४ वर्षीय सागरमय आपल्या पत्नीद्वारे संक्रमित झाले होते. यानंतर कोरोनाने थेट सौरव गांगुलीच्या कुटुंबावर आपला निशाना साधला. गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीची पत्नी तसेच त्याचे सासू- सासरेही कोरोना संक्रमित झाले.
स्नेहाशीष बंगालचा माजी क्रिकेटपटू आहे आणि सध्या तो कॅबच्या संयुक्त सचिव पदावर कार्यरत आहे. पत्नी बरी झाल्यानंतर आता स्नेहाशीष कोरोना संक्रमित झाला आहे. त्यामुळे सौरव गांगुली आणि कुटुंबातील इतर सदस्य होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. बंगालचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे राज्य क्रीडा मंत्री लक्ष्मीतरन शुक्ला (Laxmi Ratan Shukla) यांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शुक्ला यांची पत्नी स्मिता सान्याल शुक्ला (Smita Sanyal Shukla) कोरोना संक्रमित झाल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य होम क्वारंटाईनमध्ये आहेत. स्मिता बंगाल शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात उप सचिव पदावर कार्यरत आहेत.
कॅबचे वरिष्ठ पंच एल्विस जॅक्सन आणि त्यांची पत्नीही कोरोनाच्या तावडीत सापडले आहेत. एका रुग्णालयात या दोघांवरही उपचार केले जात आहेत. यापूर्वी कॅबच्या सिव्हिल इंजीनिअरिंग विभागातीलही एक कर्मचारी कोरोना संक्रमित झाला होता. त्यामुळे कॅबचे मुख्यालय ७ दिवसांपर्यंत बंद करण्यात आले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-असा व्यक्ती, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड रातोरात मालामाल झाले
-वनडे क्रिकेट इतिहासातील हारता-हारता जिंकलेले ५ सामने…
-२ देशांचे प्रतिनिधित्व केलेले ५ क्रिकेटपटू; एकजण खेळलाय भारत आणि पाकिस्तानकडून