---Advertisement---

पोलार्ड पॉवर अजून फुल! सलग 4 चेंडूवर ठोकले 100 मीटर पेक्षा जास्तचे षटकार, पाहा व्हिडिओ

kieron pollard
---Advertisement---

सध्या वेस्ट इंडिज मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग चालू आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज किरॉन पोलार्ड त्रिनबागो नाइट रायडर्सचे नेतृत्व करत आहे. त्रिनबागो नाइट रायडर्सविरुद्ध सेंट किट्स नेव्हिस पॅट्रियट्स असा सामना चालू असताना पोलार्डने आक्रमक फलंदाजी केली आली. या सामन्यात पोलार्डने एका षटकात 4 षटकार मारले, ज्यामध्ये तीन षटकार 100 मीटरपेक्षा लांब अंतरावर पडले.

किरॉन पोलार्ड (kieron pollard) जबरदस्त फटकेबाजी करण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये एका षटकात चार लांब षटकार मारले. त्याच्या या पराक्रमाचा व्हिडिओ कॅरेबियन प्रीमियर लीगच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून खेळताना पोलार्डने अफगाणचा फिरकी गोलंदाज इझारुलहक नावेदच्या षटकात हा पराक्रम केला.

नावेद सामन्यातील 15 वे षटक टाकण्यासाठी चेंडू घेवून आला असता त्याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि किरॉन पोलार्ड स्ट्राइकवर आला. पोलार्डने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने 101 मीटर लांब षटकार ठोकला. यानंतर नावेदने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. त्यानंतर पुढच्या फ्री हिट चेंडूवर पोलार्डने दोन धावा घेतल्या आणि चौथ्या चेंडूवर तो पुन्हा नावेदसमोर आला. यावेळी पोलार्डने 107 मीटर लांब षटकार ठोकला. यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर पोलार्डने 102 मीटर लांब षटकार तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 95 मीटर लांब षटकार मारला. नावेदने या षटकात एकूण 28 धावा दिल्या.

https://twitter.com/CPL/status/1695987724774220099?s=20

पोलार्डच्या फलंदाजीमळे झाला संघाचा विजय
सामन्यात पोलार्डने नाबाद राहताना कर्णधारपदाची खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 178 धावा केल्या होत्या. प्रत्युउत्तर धावांचा पाठलाग करताना पोलार्डच्या त्रिनबागो नाईट रायडर्सने 17.1 षटकांत 4 गडी राखून लक्ष्य गाठले. पोलार्डने 16 चेंडूत 5 षटकारांच्या मदतीने 36* धावांची तुफानी खेळी केली. (cpl kieron pollard hit 4 six in one over more than 100m )

महत्वाच्या बातम्या-  
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाच झालं अवघड काम, विश्वचषकापूर्वीच मॅक्सवेलला झाली दुखापत   
सच्चा देशप्रेमी! तिरंग्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देत नीरजने दाखवली देशभक्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---